Home /News /news /

मराठवाड्यावर वरूणराजाची कृपा, पावसाची जोरदार हजेरी

मराठवाड्यावर वरूणराजाची कृपा, पावसाची जोरदार हजेरी

marathvada rain30 ऑगस्ट : पावसाने पाठ फिरवल्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग जमायला लागले. मात्र गेल्या 2 महिन्याच्या दडीनंतर शुक्रवारी रात्री मराठवाड्यात पावसाने हजेरी लावलीय. बीड, परभणी, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील 8 ही तालुक्यात पावसाने त्यात प्रामुख्याने कळंब,उस्मानाबाद तुळजापूर,उमरगा तालुक्यात मोठा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 338 मिली मीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत 524 मिलीमीटर इतका पाऊस अपेक्षित होता मात्र तेवढा पाऊस झालेला नसला तरी पावसाने दुष्काळाच्या झळा काही कमी झाल्या आहेत. कालच्या पावसाने धरणातील पाणीसाठ्यात मात्र वाढ झाली नाही. आताच्या पावसाने जरी पिकांना जीवदान मिळाले असले तरी शेतकर्‍याला आणखीन पावसाची प्रतिक्षा आहे.

बीडमध्ये रिमझिम बीड जिल्ह्यात मागच्या आठवड्यापासून रिमझिम सुरू आहे. त्यामुळे धरणातल्या पाणी साठ्यात काही अंशी वाढ झालीय. पावसाने अचानक पाठ फिरवल्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी मात्र रिमझिम पावसाने समाधानी झालाय. माजलगाव धरणात एक टक्का पाणी वाढलंय. मृत साठ्यातून आता जीवित साठ्यात पाणी पातळी वाढली आहे. तर मांजरा धरणातही पाणी साठ्यात वाढ झालीये.जिल्ह्यात मागील वर्षाच्या काळात झालेल्या पावसाच्या 65 टक्के एवढा पाऊस झाला आहे. गणेशोत्सव बरोबर आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांची पिकं ही वाचली असून उत्पादन कसं येईल याकडे आता शेतकर्‍याचं लक्ष लागलं आहे.

परभणीकर सुखावले

मागच्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसानं परभणी शहरासह जिल्ह्याभरात अर्धा तास दमदार हजेरी लावली. पावसामुळे शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच पावसाळा असल्याचा अनुभव परभणीकरांना आला. पण पावसाळा संपत आला तरी जिल्ह्यात हवा तसा पाऊस न झालेल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांनाही थोडा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पावसाला संपत आला तरीही अद्याप जिल्ह्यात केवळ 42 टक्केच पाऊस झाल्यानं मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त होतेय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Water, Water crisis, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, बीड, मराठवाड्यात

पुढील बातम्या