Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मय्यप्पनचा पाय आणखी खोलात

मय्यप्पनचा पाय आणखी खोलात

मुंबई 27 मे : आयपीएलचा सहावा हंगाम रविवारी संपला असला तरी मैदानाबाहेरचा फिक्सिंगच्या वादाचा सामना अजूनही सुरू आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेल्या बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यप्पनचा पाय आणखी खोलात गेलाय. मी टीमचा पदाधिकारी नाही, मालक नाही असा दावा करणार मय्यप्पनची पोलखोल झालीय. मय्यप्पन टीमचा पदाधिकारी असल्याचा धडधडीत पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. आयपीएलचे कमिशनर राजीव शुक्ला यांनी 2 वर्षांपूर्वी चेन्नई सुपर किंग्जला पाठवलेल्या एका ईमेलमध्ये मय्यप्पनचा उल्लेख चेन्नई सुपर किंग्जचा मालक असा केला आहे. डिसेंबर 2011 मध्ये राजीव शुक्ला यांनी हा ईमेल पाठवला होता. तर दुसरीकडे श्रीनिवासन मय्यप्पनला वाचवण्याचा अजूनही प्रयत्न करत आहे. रविवारी मय्यप्पनच्या चेन्नईतल्या घरावर रविवारी मुंबई पोलिसांनी छापे टाकले. यात चेन्नई सुपर किंग्जची विझिटिंग कार्ड्स मिळाली आहेत. त्यावर गुरुनाथ मय्यप्पनचा टीम प्रिन्सिपल असा उल्लेख केला गेलाय. श्रीनिवासन यांनी मय्यप्पन हे चेन्नई टीमचे कोणीही पदाधिकारी नाहीत असं म्हटलं असलं तरी मय्यप्पन यांच्या घरातून अनेक पुरावे मिळाले आहेत. मय्यप्पन याला शुक्रवारी अटक करण्यात आली असून त्याला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मुंबईत 6 बुकींना अटकरविवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावल्या प्रकरणी मुंबईमधून आज 6 बुकींना अटक करण्यात आलीय. 4 बुकींना देवनारच्या छेला मार्केट परिसरातून अटक झाली. तर 2 बुकींना घाटकोपरच्या 90 फीट रोड परिसरातून अटक करण्यात आली. या बुकींकडून 8 मोबाईल फोन आणि 4 लाख रूपये जप्त केले गेलेत. देवनार पोलिसांनी ही कारवाई केली. या सट्टेबाजांनी हे बेटिंग फायनल मॅचवर केलं असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. बुकींचे पाकिस्तान कनेक्शन मुंबई क्राईम ब्रँचनं सट्टेबाजी प्रकरणात पुण्यातून दोन जणांना आज पहाटे ताब्यात घेतलं. चौकशीनंतर आज दुपारी त्यांना अटक करण्यात आली. दिनेश शर्मा आणि किशोर बबलानी अशी या बुकींची नावं आहेत. अटकेत असलेल्या आरोपी रमेश व्यासकडे 30 टेलिफोन लाईन्स सापडल्या होत्या. या लाईन्स पाकिस्तानी बुकींना जोडून दिल्या होत्या. रमेश व्यासच्या माध्यमातून पाकिस्तानातले बुकी या टेलीफोन लाईन्सच्या माध्यमातून किशोर पुणे याच्याकडे सट्टा लावत होते. किशोर पुणे हा सध्या फरार झाला.

पुढे वाचा ...

मुंबई 27 मे : आयपीएलचा सहावा हंगाम रविवारी संपला असला तरी मैदानाबाहेरचा फिक्सिंगच्या वादाचा सामना अजूनही सुरू आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेल्या बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यप्पनचा पाय आणखी खोलात गेलाय. मी टीमचा पदाधिकारी नाही, मालक नाही असा दावा करणार मय्यप्पनची पोलखोल झालीय.

मय्यप्पन टीमचा पदाधिकारी असल्याचा धडधडीत पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. आयपीएलचे कमिशनर राजीव शुक्ला यांनी 2 वर्षांपूर्वी चेन्नई सुपर किंग्जला पाठवलेल्या एका ईमेलमध्ये मय्यप्पनचा उल्लेख चेन्नई सुपर किंग्जचा मालक असा केला आहे. डिसेंबर 2011 मध्ये राजीव शुक्ला यांनी हा ईमेल पाठवला होता.

तर दुसरीकडे श्रीनिवासन मय्यप्पनला वाचवण्याचा अजूनही प्रयत्न करत आहे. रविवारी मय्यप्पनच्या चेन्नईतल्या घरावर रविवारी मुंबई पोलिसांनी छापे टाकले. यात चेन्नई सुपर किंग्जची विझिटिंग कार्ड्स मिळाली आहेत. त्यावर गुरुनाथ मय्यप्पनचा टीम प्रिन्सिपल असा उल्लेख केला गेलाय. श्रीनिवासन यांनी मय्यप्पन हे चेन्नई टीमचे कोणीही पदाधिकारी नाहीत असं म्हटलं असलं तरी मय्यप्पन यांच्या घरातून अनेक पुरावे मिळाले आहेत. मय्यप्पन याला शुक्रवारी अटक करण्यात आली असून त्याला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

मुंबईत 6 बुकींना अटक

रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावल्या प्रकरणी मुंबईमधून आज 6 बुकींना अटक करण्यात आलीय. 4 बुकींना देवनारच्या छेला मार्केट परिसरातून अटक झाली. तर 2 बुकींना घाटकोपरच्या 90 फीट रोड परिसरातून अटक करण्यात आली. या बुकींकडून 8 मोबाईल फोन आणि 4 लाख रूपये जप्त केले गेलेत. देवनार पोलिसांनी ही कारवाई केली. या सट्टेबाजांनी हे बेटिंग फायनल मॅचवर केलं असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. बुकींचे पाकिस्तान कनेक्शन मुंबई क्राईम ब्रँचनं सट्टेबाजी प्रकरणात पुण्यातून दोन जणांना आज पहाटे ताब्यात घेतलं. चौकशीनंतर आज दुपारी त्यांना अटक करण्यात आली. दिनेश शर्मा आणि किशोर बबलानी अशी या बुकींची नावं आहेत. अटकेत असलेल्या आरोपी रमेश व्यासकडे 30 टेलिफोन लाईन्स सापडल्या होत्या. या लाईन्स पाकिस्तानी बुकींना जोडून दिल्या होत्या. रमेश व्यासच्या माध्यमातून पाकिस्तानातले बुकी या टेलीफोन लाईन्सच्या माध्यमातून किशोर पुणे याच्याकडे सट्टा लावत होते. किशोर पुणे हा सध्या फरार झाला.

First published: