मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मनसेचे आ.प्रवीण दरेकर वर्षभरासाठी निलंबित

मनसेचे आ.प्रवीण दरेकर वर्षभरासाठी निलंबित

    pravin darekar26 जुलै : शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांना आज निलंबित करण्यात आलं आहे.त्यांच्यापाठोपाठ मनसेचे आमदार प्रविण दरेकर यांना सभागृहात शिवीगाळ केल्याप्रकरणी एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलंय.

    2014च्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरपर्यंत त्यांना विधिमंडळाच्या आवारात प्रवेश करता येणार नाही. गुरूवारी सुरू झालेल्या मुंबईच्या प्रश्नांसंबंधीतल्या चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देत असताना विरोधकांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. हा गोंधळ सुरू असताना मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाहात शिवीगाळ करत आपली नापसंती व्यक्त केली. त्याप्रकरणी हे निलंबन करण्यात आलंय. दिवाकर रावते यांनी विधानसभेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या दालनात असभ्य वर्तन केलंय. त्यामुळे त्यांना 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलंय.

    First published:

    Tags: MNS, Pravin darekar, प्रवीण दरेकर, मनसे