मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

भूसंपादन विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ देणार नाही -पवार

भूसंपादन विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ देणार नाही -पवार

pawar on modi09 मे : भूसंपादन विधेयकावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीका केलीये. या नव्या कायद्यामुळे सरकारला शेतकर्‍यांच्या जमिनी परस्पर काढून घेण्याचा अधिकार मिळणार आहे. म्हणूनच राष्ट्रवादीचा या कायद्याला विरोध असून राज्यसभेत आम्ही हे विधयेक मंजूर होऊ देणार नाही असा इशारा पवारांनी दिलाय.

या अगोदरही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन विरोध दर्शवला होता. यूपीए सरकारच्या काळात शेतकर्‍यांच्या सहमतीची तरतूद केली होती. ती तरतूद रद्द करण्यात आलीये. तसंच सोशल इम्पॅक्ट ऍसेसेमेंटबाबतही तसंच केलंय आणि शेतकर्‍यांची घेतलेली जमीन जर 5 वर्षे वापराविनाच पडून राहिली, तर ती परत द्यायला हवी अशी तरतूद केली होती. ती बदलण्याचा विचारही सुरू आहे. या तिन्ही गोष्टींना पवारांनी विरोध केलाय. या विधेयकाबाबत सर्वच राजकीय पक्षांशी विचारविनिमय करू, असं सरकारने स्पष्ट केलंय पण आम्ही केलेल्या कायद्यात प्रस्तावित केलेले हे बदल आम्हाला मान्य नाहीत. हे मुद्दे लक्षात घेता आम्ही या विधेयकाला पाठिंबा देऊ शकणार नाही, हे आम्ही चर्चेदरम्यान सरकारच्या निदर्शनास आणून देऊ असंही पवारांनी स्पष्ट केलं होतं. आता पुन्हा एकदा पवारांनी आक्रमक पवित्रा घेतला असून विधेयक पास होऊ देणार नाही असा इशारा दिलाय.

 ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: भूसंपादन विधेयक, शरद पवार