मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /'भूमीपूजनाला आला तर कुदळ डोक्यात टाकू'

'भूमीपूजनाला आला तर कुदळ डोक्यात टाकू'

    nandurbar news11 नोव्हेंबर : भूमीपूजनाला आलात तर तीच कुदळ तुमच्या डोक्यात टाकू....हा इशारा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलाय तो चक्क काँग्रेसच्याच एका आमदारांनी.

    नंदुरबार जिल्ह्यात तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्पावरून काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. हा प्रकल्प व्हावा अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे तर कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही असं म्हणत काँग्रेस इरेला पेटलीय.

    आता तर काँग्रेसचे आमदार के. सी पाडवी यांनी या प्रकल्पाविरोधात आदिवासींसह सत्याग्रह केलाय. आणि या प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आले तर त्यांच्या डोक्यात तीच कुदळ घालण्याचा इशारा दिलाय.

    First published: