14 मार्च : कॅप्टन कूल धोणीच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकपच्या मैदानात उतरलेली भारताचा विजयी रथ सुसाट सुटला असून आज झिम्बाब्वेला चिरडत विजयी षटकार लगावलाय. टीम इंडियाने आज सलग सहावा विजय मिळवलाय. झिम्बाव्वेचा भारतानं आज 6 विकेटनं पराभव केलाय. पण या विजयासाठी झिम्बाव्वेनंही भचांगलं झुलवलं. पण अखेर रैनाची शानदार सेंच्युरी आणि धोणीची कॅप्टन इनिंगने विजय 'षटकार' लगावला.
टॉस जिंकून टीम इंडियानं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि यजमान झिम्बाब्वेला बॅटिंगची पहिली संधी दिली. परंतु, झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली. त्यांच्या पहिल्या 3 विकेट झटपट गेल्या. पण आपली शेवटची मॅच खेळत असलेल्या ब्रेंडन टेलरनं अफलातून बॅटिंग केली. टेलरनं 110 बॉल्समध्ये 15 फोर आणि 5 सिक्स ठोकत 138 रन्स केले. तर त्याला उत्तम साथ दिली ती शॉन विल्यम्सनं. विल्यम्सनं हाफ सेंच्युरी ठोकली आणि झिम्बाव्वेनं भारतासमोर विजयासाठी 288 रन्सचं मोठं टार्गेट ठेवलं. 288 धावांच्या पाठलाग करणार्या टीम इंडियाची सुरुवातही खराब झाली. रोहित शर्मा आणि शिखर धवन झटपट आऊट झाले. कोहली आणि रहाणेनं इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण तेही जास्त काळ टिकू शकले नाहीत. पण त्यानंतर सुरेश रैना आणि कॅप्टन धोणीनं आपला झंझावात दाखवत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रैनानं वन डे करिअरमधील पाचवी सेंच्युरी ठोकली तर धोणीनंही शानदार हाफ सेंच्युरी ठोकली. या विजयाबरोबर टीम इंडियानं या वर्ल्ड कपमध्ये विजयी षटकार मारलाय.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.