16 मे : नागपुरात सध्या भाजपचे केंद्रीय मंत्री आणि पक्ष प्रमुखांच्या फेर्या जरा जास्तच वाढल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे चीनच्या दौर्यावर गेले असतानाच इकडे भाजपचे ज्येष्ठ नेते मात्र इकडे नागपुरातल्या संघ मुख्यालयात हजेरी लावताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरूवारी राजनाथ सिंह येऊन गेले. आज अमित शाह आलेत आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर येत आहेत. म्हणूनच भाजप नेत्यांच्या नागपूर भेटींमागे नेमकं दडलंय काय याबाबत नाना तर्क वितर्क लावले जात आहे.
आज भाजप अध्यक्ष अमित शहा नागपुरात आहेत ते आज सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतायत. ही बैठक एक वाजेपर्यंत चालेल, असा अंदाज आहे. मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय आणि या एक वर्षांचं प्रगती पुस्तक देण्यासाठी शहा येतायत, अशी सूत्रांची माहिती आहे. गुरूवारी राजनाथ सिंह आले होते, आणि आज शहा आले, त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहे.
तर दुसरीकडे मोहन भागवतांची भेट घेण्याआधी अमित शहांनी नितीन गडकरींची त्यांच्या निवासस्थानी जाऊ भेट घेतली. ही सदीच्छा भेट होती. शहा आज सकाळीच नागपुरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी थेट गडकरींचं निवासस्थान गाठलं. त्यानंतरच ते संघ मुखालयात गेले त्यामुळे आधी गडकरी वाडा आणि नंतर संघ मुख्यालय अशा या लागोपाठ दोन्ही भेटींमध्ये नेमकं दडलंय काय अशी चर्चा रंगलीये..
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Nagpur, RSS, अमित शहा, बैठक, भाजप, मोहन भागवत, सरसंघचालक