15 फेब्रुवारी : जरी राज्यात आणि इतर महापालिकेत स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत असली तरी नाशिकमध्ये मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. राजू शेट्टी यांच्या या भूमिकेनं भाजपला चांगलाच दणका बसला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती केल्यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही भाजपसोबत युती करायचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला होता. पण जिल्हा परिषद तसंच महापालिका निवडणुकीत जागावाटपात भाजपनं शेट्टी यांना विश्वासात घेतलं नाही. त्यांच्याशी जागावाटपाची साधी चर्चाही केली नाही आहे. त्यात, ग्रामीण भागात नोटाबंदी, शेतीमालाचे भाव तसंच कांद्याच्या आंदोलनांबाबत भाजपविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.