02 जून : विधानपरिषद निवडणुकीत बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपमधील निष्ठावान कार्यकर्ते नाराज झाले आहेत. हे नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगल्यावर भेटण्यासाठी गेले होते. पण मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची भेट झाली का, याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

विधानपरिषदेसाठी भाजप सहा जागा लढवणार आहे. भाजपने मित्रपक्षांना दोन जागा देऊ केल्या आहे. स्वाभिमानी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटेंना उमेदवारी देण्यात आलीये. तर मनसेला सोडचिठ्ठी देऊन प्रवीण दरेकर भाजपमध्ये आले त्यांनाही उमेदवारी देण्यात आलीये. तसंच काँग्रेसचे नेते कृपाशंकर यांचे खास असलेले आर.एन. सिंह आणि राष्ट्रवादीतून आलेले प्रसाद लाड यांनाही उमेदवारी देण्यात आलीये. भाजपचे निष्ठावंत नेते माधव भंडारी यांना तिकीट मिळण्याची शक्यता होती पण त्यांच्या जागी प्रवीण दरेकर यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे भाजपच्या गोटात नाराजी पसरलीये. बाहेरून आलेल्यांना उमेदवारी आणि पक्षांतील निष्ठावंतांना डावलण्यात आल्यामुळे अनेक कार्यकर्ते दुखावले गेले आहे. या नाराज पदाधिकार्यांची मुख्यमंत्र्यांनी नाराजी दूर केली आहे का? हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.