12 जानेवारी : राज्यात महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक होत आहे.ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाला कार्यकारिणी बैठक आहे. कार्यकरणीच्या बैठकीत युतीबाबत जिल्ह्यातील पदाधिकारीचा सूर काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
कार्यकारिणीच्या सुरुवातीला प्रदेशध्यक्ष रावसाहेब दानवे अध्यक्षीय भाषण करतील. तर समारोपीय भाषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. बैठकीत दिवसभरात 2 प्रस्ताव मांडण्यात येतील त्यात नोटबंदीचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणणार, तर नगरपालिका निवडणुकीमध्ये मिळालेलं यश आणि येणाऱ्या महापालिका , जिल्हा परिषद निवडणुका याबाबत प्रस्ताव विनोद तावडे आणणार आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, कार्यकारिणी, बैठक, भाजप