मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /भाजपच्या ऑफिसमध्ये जल्लोषाची तयारी तर काँग्रेसमध्ये शुकशुकाट !

भाजपच्या ऑफिसमध्ये जल्लोषाची तयारी तर काँग्रेसमध्ये शुकशुकाट !

    474bjp_congress_office15 मे : लोकसभेच्या निकालाची देशालाच नाही तर संपूर्ण जगाला उत्सुकता लागली आहे. पोस्ट पोल सर्व्हेमध्ये सगळ्याच पक्षांना आपलं भविष्य काय असेल याचा अंदाज आलाय. भाजपच्या कार्यालयांमध्ये आनंद, उत्साह दिसतोय. तर काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये तुलनेने शांतता दिसतेय. भाजप आणि काँग्रेसच्या गोटात कशी तयारी सुरू आहे याबद्दलचा हा खास रिपोर्ट...

    भाजपच्या स्थानिक कार्यालयांमध्ये गडबड तर काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये थोडं उदासिन वातावरण..मतमोजणीच्या अवघे काही तास आधीचं हे दृश्य...या दृश्यांवरून आगामी सरकार कोणतं असेल याचं चित्र बर्‍याच प्रमाणात स्पष्ट होतंय. पोस्ट पोल सर्व्हेच्या निकालानंतर उत्साहित भाजप कार्यकर्त्यांनी दिल्लीत मोदींचं स्वागत करायला मोठी तयारी केलीय. भाजपने या एसी हॉलमध्ये 32 केबिन्स बनवलीत. या केबिन्समध्ये पक्षाचे नेते मीडियाशी चर्चा करतील. लोकशाहीचा हा उत्सव खास बनवण्यासाठी भाजपने 2000 किलो लाडू बनवले आहेत. विमानतळावरून पक्ष कार्यालयापर्यंत फुलांच्या पायघड्या घालण्याची तयारी करण्यात आलीय. याच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावर रोषणाई आणि आतशबाजीची तयारीही करण्यात आलीय.

    काँग्रेस कार्यालयांमध्येही तयारी सुरू आहे. पण इथे उत्साह कुठेच दिसत नाहीय. खरं तर खुद्द सोनिया गांधी सगळ्या पोस्ट पोल सर्व्हेंना नाकारत आहेत. पण काँग्रेसला स्वतःचा पराभव समोर दिसतोय हे नक्की...पण पराभवाआधी पराभव जाणवू नये यासाठी काँग्रेसची धडपड सुरू आहे. इथेही मीडियाशी चर्चा करण्यासाठी तयारी सुरू आहे. काँग्रेस कार्यालयात 32 एसी केबिन्स तयार करण्यात आली आहेत. इथे अजय माकन यांच्या नेतृत्वाखाली देशभरातून आलेले पक्ष प्रवक्ते निवडणूक निकालांची समीक्षा करतील आणि काँग्रेसची बाजू मांडतील.

    आम आदमी पार्टी तर काही वेगळ्याच तयारीत आहे. अरविंद केजरीवाल सकाळी अकराच्या सुमारास वाराणसीत पोहोचतली असं सांगण्यात येतंय. जर केजरीवालांनी मोदींना हरवलं तर त्यासाठी रोड-शोची तयारी त्यांनी सुरू केली.

    आता काही तासांमध्येच देशात कोणाचं सरकार येणार हे स्पष्ट होईल पण ही तयारी बघितल्यावर सहज कोणत्या पक्षाला आपल्या मेहनतीवर अधिक विश्वास आहे, हे सहज स्पष्ट होतंय.

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    [if0] [sc0]

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    First published:

    Tags: BJP Prospects, Bsp, ConnectTheDots, Elections 2014, Exit polls 2014, Lok Sabha elections 2014, Narendra modi, NDA, Post-poll survey, Sonia gandhi, UPA, एक्झिट पोल, एक्झिट पोलची चिंता नाही -सोनिया गांधीabki bar modi sarkar, काँग्रेस, नरेंद्र मोदी, पोस्ट पोल सर्व्हे, भाजप, सोनिया गांधी