मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

भाजपचा सिंचन घोटाळा?, अशा प्रकारे वाढली पैनगंगा प्रकल्पाची किंमत

भाजपचा सिंचन घोटाळा?, अशा प्रकारे वाढली पैनगंगा प्रकल्पाची किंमत

" isDesktop="true" id="207277" >

मनोज जैसवाल,प्रफुल्ल खंदारे आणि मंगेश चिवटे, वाशीम - 07 मार्च : पैनगंगा जलसिंचन घोटाळ्यामध्ये आता नवनवीन धक्कादायक पुरावे आयबीएन लोकमतच्या हाती लागले आहेत. वाशीम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजेसच्या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देताना प्रकल्पाची किंमत 8 पटींनी वाढविल्याची बातमी सर्वप्रथम आयबीएन लोकमतने दाखविली होती. यामध्येच आता प्रत्येक बँरेज ची किंमत किती कोटींनी वाढली याचा सविस्तर आढावा घेणारा हा रिपोर्ट...

painganga_project4 पैनगंगा नदीवरील 11 बॅरेजेसची किंमत कशा प्रकारे वाढली

1 वरूड बॅरेज                मुळ किंमत 7.83कोटी                     वाढीव किंमत 55.80कोटी        

2 जुमडा बॅरेज             मुळ किंमत 9.61    कोटी                 वाढीव किंमत 60.55कोटी        

3 कोकलगाव बॅरेज       मुळ किंमत 9.42    कोटी                वाढीव किंमत 60.70    कोटी            

4 अडगाव बॅरेज           मुळ किंमत 8.60    कोटी                वाढीव किंमत 56.28कोटी        

5 गणेशपुर बॅरेज          मुळ किंमत 8.66    कोटी                वाढीव किंमत 57.61कोटी        

6 राजगाव बॅरेज           मुळ किंमत 6.96    कोटी                वाढीव किंमत 54.57कोटी        

7 उकळी बॅरेज              मुळ किंमत 7.86    कोटी                वाढीव किंमत 89.26    कोटी        

8 सोनगव्हाण बॅरेज      मुळ किंमत 8.68    कोटी                वाढीव किंमत 61.89कोटी        

9 टनका बॅरेज               मुळ किंमत 6.84    कोटी                वाढीव किंमत 67.68    कोटी        

10 ढिल्लि बॅरेज            मुळ किंमत 9.46    कोटी                वाढीव किंमत 73.86कोटी        

11 जयपुर बॅरेज             मुळ किंमत 7.82    कोटी                वाढीव किंमत 78.20कोटी    

    

एकूण 11 बॅरेजेस               मुळ किंमत 91.74कोटी            वाढीव किंमत 716.41कोटी        

पैनगंगा सिंचन प्रकल्पाला पहिली मान्यता फक्त 91 कोटीची असतांना पुन्हा 716 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता कशाला असा सवाल सिंचन अभ्यासक विजय पांढरे यांनी केलाय. वाढीव 600 कोटी रूपये खर्च केल्यामुळे पाणीसाठ्यात मुळीच वाढ होणार नाही. सिंचन क्षेत्र हि वाढणार नाही, असा दावा करत केवळ ठेकेदारांच्या दबावापोटी तर ही मान्यता दिली गेली का याची चौकशी करण्याची मागणी पाढंरे यांनी केलीये.

पैनगंगा सिंचन प्रकल्पला 600 कोटींची वाढीव सुप्रमा देताना खूप मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलाय. कंत्राटदार माझा नातेवाईक असला तरी निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलीये. जलसंपदा खात्याला फारपुर्वीपासून भ्रष्टाचाराची कीड लागल्याचं सांगून त्यांनी अप्रत्यक्ष अजित पवार आणि सुनिल तटकरे यांना लक्ष्य केलंय.

सिंचन घोटाळ्यावरुन रान उठवत भाजप- शिवसेना युती सत्तेत आली खरी. मात्र, या अधिवेशनातच सरकारला पैनगंगा सिंचन घोटाळ्याच्या आरोपांना सामोर जाव लागणार असं दिसतंय. थोडक्यात या निमित्तानं भाजपचा पहिला सिंचन घोटाळा समोर आलाय हे नक्की..


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Follow @ibnlokmattv


First published:

Tags: Painganga project, गिरीज महाजन, पैनगंगा नदी, पैनगंगा प्रकल्प, वाशीम, सिंचन घोटाळा, सिंचन प्रकल्प