मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /भाजपचा रथ रोखण्यासाठी जनता परिवाराकडून नितीशकुमार मैदानात

भाजपचा रथ रोखण्यासाठी जनता परिवाराकडून नितीशकुमार मैदानात

  nitish kumar bihar08 जून : भाजपचा रथ थांबवण्यासाठी बिहारमध्ये आता नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव एकत्र आले आहे. बिहारमध्ये नितीश कुमार हेच जनता परिवाराचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील. जनता परिवाराचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी यावर शिक्कामोर्तब केलंय. नीतिश कुमार आणि आपले वाद मिटले असून आम्ही भाजप आणि इतर जातीयवादी शक्तींशी मुकाबला करण्यासाठी एकत्र येत आहोत असं राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटलंय ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

  लालूंनी वादावर पडदा टाकत मैत्रीचा हात पुढे केलाय. आमच्यात मतभेद होते, पण आता आम्ही सोबत आहोत. आमच्या वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आता आमचं लक्ष हे जातीयवादी शक्तींना पराभूत करणे आहे. साक्षी महाराज सारख्या तत्वांविरोधात लढा देणार आहे. कारण ही लोक आजही राम मंदिराचं राजकारण करताय. बिहारच्या निवडणुकीत या शक्तींना थांबवण्यासाठी विष पिण्याचीही तयारी आम्ही ठेवतो असंही लालू म्हणाले.भाजपला हरवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलोय असंही लालूंनी जाहीर केलं.

  सूत्रांच्या म्हणण्यानुसार नीतीश कुमार यांनी राहुल गांधींची भेट घेतल्यावर बिहारच्या मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर लालूंनी माघार घेतली.दरम्यान, भाजपचंही बिहरामधल्या स्थितीवर लक्ष असून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे सध्या पाटण्यात आहेत.

  ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

  [if0] Follow @ibnlokmattv[sc0]

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  First published:
  top videos

   Tags: BJP