Home /News /news /

भाईंदर खाडीच्या पोटातून धावणार मुंबई-अहमदाबादची बुलेट ट्रेन

भाईंदर खाडीच्या पोटातून धावणार मुंबई-अहमदाबादची बुलेट ट्रेन

bullet train

21  एप्रिल : मुंबई - अहमदाबाददरम्यान प्रस्तावित बुलेट ट्रेनने प्रवास करणार्‍या प्रवाशांना पाण्याखालून प्रवास करण्याचा थरार अनुभवता येणार आहे. ठाणे खाडी पार केल्यानंतर देशातील ही पहिली बुलेट ट्रेन भाईंदर खाडीच्या पोटातून धावणार आहे. त्यासाठी समुद्राखाली 21 किलोमीटरचा बोगदा बनवला जाणार आहे.

अवघ्या 2 तासांत ही ट्रेन मुंबईहून अहमदाबाद गाठेल. ताशी कमाल 320 किलोमीटर वेगाने धावणार्‍या या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग 508 किलोमीटरचा आहे. या मार्गावर भाईंदरच्या खाडीनंतर विरारकडे जाताना एक टप्पा समुद्राखालून जाणार आहे.

हा प्रकल्प उभारणार्‍या जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीने (जेआयसीए) सादर केलेल्या प्रकल्प अहवालात हे नमूद असल्याची माहिती एका वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍याने दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 97 हजार 636 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यातील 81 टक्क्यांचा निधी जपानकडून मिळणार्‍या कर्जातून उभारला जाईल. या ट्रेनची सिग्नल यंत्रणा व पॉवर सिस्टीमही जपानकडून पुरवण्यात येणार आहे. हे कर्ज 50 वर्षांसाठी वार्षिक 0.1 टक्के व्याज दराने मिळणार आहे. तसंच, या ट्रेनची सिग्नल यंत्रणा व पॉवर सिस्टीमही जपानकडून पुरवण्यात येणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: बुलेट ट्रेन, मुंबई-अहमदाबाद

पुढील बातम्या