Home /News /news /

बुलेट ट्रेन आधी मुंबईची लोकल सुधारा, सेनेचा विरोध

बुलेट ट्रेन आधी मुंबईची लोकल सुधारा, सेनेचा विरोध

sena on bulet train15 डिसेंबर : स्मार्ट सिटीचा मुद्दा निवळत नाही तर आता बुलेट ट्रेनवरून राजकारण सुरू झालंय. शिवसेना आणि काँग्रेसनं पंतप्रधान मोदींच्या आवडत्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध केला आहे. आधी मुंबईतल्या लोकल ट्रेन आणि रेल्वे स्थानकं सुधारा, मग आपण बुलेट ट्रेनचं बघू असं शिवसेनेनं ठणकावलं. तसंच एक लाख कोटींचं कर्ज काढण्याआधी मुंबईतले प्लॅटफॉर्म नीट बांधा मुंबईतल्या माणसांचा आधी विचार करा, असा सल्लावजा टोला सेनेचे खासदार संजय राऊतांनी लगावला. त्याला काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनीही पाठिंबा दिलाय.

बुलेट ट्रेन जगात कुठेही यशस्वी झालेली नाही. एक लाख कोटी रुपये एवढी मोठी रक्कम यावर खर्च करणं योग्य आहे का, याचा विचार सरकारनं करावा, असं सातव म्हणाले. सेनेला भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी चोख उत्तर दिलंय. संजय राऊत यांच्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नाही. राऊतांना बरळण्याची सवय आहे, त्यांच्या या वक्तव्याला काहीही अर्थ नाही. आधी मुंबईतले रस्ते आणि बेस्ट सुधारा, असं प्रत्युत्तर भांडारींनी दिलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदी, बुलेट ट्रेन, शिवसेना, संजय राऊत

पुढील बातम्या