मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बिहार विधानसभा निवडणुकीत जनता परिवाराला पाठिंबा देणार -पवार

बिहार विधानसभा निवडणुकीत जनता परिवाराला पाठिंबा देणार -पवार

Sharad Pawar on tobacco09 जून : बिहार विधानसभा निवडणुकीत जनता परिवाराला पाठिंबा देणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचं पाटण्यामध्ये अधिवेशन होतंय. त्यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. आज रात्री साडे आठ वाजता शरद पवार नितीश कुमार यांची भेटही घेणार आहेत. बिहारमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचं बिहारमध्ये अधिवेशन सुरू आहे. आज नियोजित कार्यक्रमाप्रमाणे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, पाटण्यात अधिवेशन करण्याचा निर्णय आम्हीच घेतला. या अधिवेशनाला देशभरातून 700 प्रतिनिधी आले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्याशी चर्चा झाली. त्यातून 10 जागा मुख्य पक्षांना, 3 काँग्रेसला आणि आम्हाला 1 जागा मिळाली आहे. विधानसभा निवडणुकांसाठीही एकत्र येऊन काम करणार असंही पवारांनी स्पष्ट केलं. तसंच हा इतिहास आहे की बिहारची जनता देशाच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचे काम करते. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा हे काम होईल, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला. आज संध्याकाळी शरद पवार नितीश कुमार यांची भेट घेणार आहे. दरम्यान, छगन भुजबळांवर झालेला जमीन गैरव्यवहाराचा आरोप हे राजकीय षडयंत्र असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: NCP, Sharad pawar, पाटणा, बिहार, राष्ट्रवादी काँग्रेस

पुढील बातम्या