मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बिहारमधल्या 8 जिल्ह्यांना कोसीच्या पुराचा धोका

बिहारमधल्या 8 जिल्ह्यांना कोसीच्या पुराचा धोका

Landlside_in_Nepal_AP_650

04  ऑगस्ट :   नेपाळमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे कोसी नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली असून, बिहारमधल्या 8 जिल्ह्यांत पुराचा धोका कायम आहे. या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोसी नदीकाठावरच्या 30 गावांना इतरत्र सुरक्षितस्थळी हलवलं आहे. कोसी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने सुमारे 20 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सरकारने 84 ठिकाणी रिलिफ कॅम्प उभारण्यात आले आहेत तर पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी 8 एनडीआरएफची आणि 4 एसडीआरएफची पथके पाठविण्यात आली आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Nepal, नेपाळ, बिहार