मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बाळासाहेबांना अमेरिकेत बोलावून मारण्याचा होता कट,हेडलीचा गाैैप्यस्फोट

बाळासाहेबांना अमेरिकेत बोलावून मारण्याचा होता कट,हेडलीचा गाैैप्यस्फोट

मुंबई - 25 मार्च : भारतामध्ये बाळासाहेब ठाकरे यांना मारण्याऐवजी त्यांना अमेरिकेत बोलावून मारण्याचा कट होता असा गौप्यस्फोट डेव्हिड हेडली याने केलाय. तसंच त्याने पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसुफ रजा गिलानी घरी भेटायला आले होते असा खुलासाही केला.DavidColemanHeadley

26/11 हल्ल्यातील आरोप डेव्हिड हेडली सद्धा अमेरिकेतील तुरुंगात शिक्षा भोगत आहे. अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याची उलटतपासणी सुरू आहे. काल गुरुवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्यासाठी लष्कर-ए-तोयबाने कट रचला होता. आणि त्यांना मारण्यासाठी दहशतवादीही पाठवला होता असा गौप्यस्फोट केला होता. मात्र, हा कट नक्की काय होता, बाळासाहेबांना मारण्यासाठी काय योजना आखली जात होती, याची माहिती आज त्याला विचारण्यात आली. भारतामध्ये बाळासाहेबांना मारण्याऐवजी त्यांना अमेरिकेत बोलावून मारण्याचा कट होता असं आता त्याच्या माहितीवरून समजतंय. अमेरिकेत शिवसेनेसाठी मदतनिधी कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार होता. त्या कार्यक्रमासाठी बाळासाहेबांसह संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांना आमंत्रण देणार होतो अशी कबुली डेव्हिड हेडलीने दिली. या कार्यक्रमासाठी राजाराम रेगेची मदत घेणार होतो असा खुलासाही त्याने केला.

'युसुफ रजा गिलानी घरी आले होते'

हेडलीचे वडील पाकिस्तानी प्रशासकीय व्यवस्थेत मोठ्या हुद्द्यावर होते. तसंच हेडलीचा भाऊ दानियाल आणि इतर नातेवाईक देखील प्रशासकीय व्यवस्थेत मोठ्या हुद्द्यावर होते. 25 डिसेंबर 2008 रोजी हेडलीचे वडील वारले त्यानंतर पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांनी हेडलीच्या घरी भेट दिली होती. अशी माहिती हेडलीने त्याचा उलटतपासणीत दिली. तसंच हेडलीचे एलईटीशी संबंध आहेत. हे त्याच्या घरच्यांना आणि नातेवाईकांना माहीत होते. हेडलीचा पाकिस्तानी मित्र सहुलत राणा याच्याकडे हेडलीने 26/11 च्या हल्ल्याबाबत सहुलत राणाशी चर्चा केली होती.

लहानपणापासून भारताचा राग

मी माझ्या लहानपणापासूनच भारत आणि भारतीय लोकांना द्वेश करत होतो. 7 डिसेंबर 1971 मधे जेव्हा भारताने पाकिस्तानवर बॉम्ब हल्ला केला होता. तेव्हापासून मला भारतावर राग आहे. त्या बॉम्ब हल्ल्यात मी ज्या शाळेत शिकत होतो ती शाळा बॉम्बहल्ल्यात नेस्तनाबूत झाली होती आणि काही कामगरांचा त्यात मृत्यू झाला होती याचा बदला घेण्यासाठी मी एलईटी ज्वाईन केला.

First published:

Tags: बाळासाहेब ठाकरे, शिवसेना