मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बाळासाहेबांच्या स्मारकाचं विधेयक पास, सेना आमदारच गैरहजर

बाळासाहेबांच्या स्मारकाचं विधेयक पास, सेना आमदारच गैरहजर

balasaheb_smark07 मार्च : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भातल्या विधेयकावर विधिमंडळात चर्चा सुरू असताना शिवसेना आमदार गैरहजर राहिल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला. सेना आमदाराच्या गैरहजेरीत विधेयक पास झालाय.

विधानसभेत बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला देण्याच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करण्यासाठी विधेयक आणण्यात आलं होतं. मात्र, जेव्हा विधेयकावर चर्चा सुरू असताना शिवसेना आमदार गैरहजर होते. विधानसभेतले शिवसेना पक्षप्रतोद सुनील प्रभूंनी माहिती दिली नसल्याची सारवासारव शिवसेना आमदारांनी केली.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेनेनं नेहमी आक्रमक भूमिका घेतली.महापालिका निवडणुकीच्या प्रचारातही बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दा गाजला. एवढंच नाहीतर शिवसेनेच्या वचननाम्यातून बाळासाहेबांचा स्मारकाचा मुद्दा नव्हता असा आरोपच भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला होता. आणि भाजपने आपल्या जाहीरनाम्यात बाळासाहेबांचं स्मारक करणारच असं आश्वासन दिलं होतं.

भाजपने आज आपला शब्द पाळला. पण, ज्यांच्या स्मारकाच्या मागणीसाठी अधिकृत अधिकार असलेल्या शिवसेनेचे एकही आमदार यावेळी हजर नव्हता. मात्र, झालेल्या प्रकारामुळे शिवसेनेच्या आमदारांची चांगलीच पंचाईत झाली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: Shivsena, बाळासाहेब ठाकरे, शिवसेना