मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बाळासाहेबांचं स्मारक कधी होणार ?

बाळासाहेबांचं स्मारक कधी होणार ?

balasheb_smarakमुंबई - 21 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारीला जयंती आहे. आता तरी बाळासाहेबांच्या स्मारकाची घोषणा होणार का याकडे शिवसैनिकांचं लक्ष आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड गाजावाजा करत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची घोषणा केली होती. पण, त्यापुढे काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यासंदर्भात पुढे काय कार्यवाही झाली अशी विचारणा करणारं पत्र शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं. पण प्रत्यक्षात असं कोणतंच पत्र आम्हाला मिळालं नसल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं जातंय.

शिवसेना आणि भाजपमधल्या वाढत्या तणावाचा फटका बाळासाहेबांच्या स्मारकाला बसतोय का असा प्रश्न विचारला जातोय. मध्यंतरी बाळासाहेबांच्या स्मारकारासाठी महापौर बंगल्याच्या जागेचा चाचपणी करण्यात आली. यावर शिवसेना नेत्यांनी समाधानही व्यक्त केलं होतं. पण, यावर अद्यापही शिक्कामोर्तब झालं नाही. स्मारकाच्या मुद्द्यावरून आता पुन्हा सेना भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: BJP, Shivsena, बाळासाहेब ठाकरे, स्मारक