Home /News /news /

'बातमी थांबवण्यासाठी झी न्यूजने मागितली खंडणी'

'बातमी थांबवण्यासाठी झी न्यूजने मागितली खंडणी'

25 ऑक्टोबरकाँग्रेस खासदार नविन जिंदल आणि झी न्यूज यांच्यात मोठा वाद पेटला आहे. कोळसा घोटाळ्याची बातमी लावू नये, यासाठी झी न्यूजनं आपल्याला खंडणी मागितल्याचा आरोप जिंदल यांनी केला. आज एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या खंडणी प्रकरणाच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओमध्ये झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया जिंदल यांच्याकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागत असल्याचं दिसतंय. पण झी न्यूजनं जिंदल यांनीच आपल्याला लाच देऊ केली, असं स्पष्टिकरण दिलं आहे. जिंदल यांनी झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादर समीर अहलुवालिया यांच्यासोबत 13, 17 आणि 19 सप्टेंबरला आपल्या कंपनीच्या लोकांसोबत बैठक झाली होती या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. याचे स्टिंग ऑपेरशन करण्यात आलं होतं ते व्हिडिओ फूटेज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केलं. तसेच हे स्टिंग थांबवण्यासाठी 100 कोटींची मागणी केली जर हे स्टिंग थांबवले नाही तर बदनामी करू अशी धमकीही झी न्यूजने दिली अशी माहितीही जिंदल यांनी दिली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे एक जिंदल यांनी तक्रार दाखल केली आहे. माझ्या सारख्या अनेक लोकांना अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग केलं जातं आणि वरतून चोराच्याच उलट्या बोंबा असं काही होतं त्यामुळे मला पुढं यावं लागलं असंही जिंदल म्हणाले.

पुढे वाचा ...

25 ऑक्टोबर

काँग्रेस खासदार नविन जिंदल आणि झी न्यूज यांच्यात मोठा वाद पेटला आहे. कोळसा घोटाळ्याची बातमी लावू नये, यासाठी झी न्यूजनं आपल्याला खंडणी मागितल्याचा आरोप जिंदल यांनी केला. आज एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या खंडणी प्रकरणाच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओमध्ये झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया जिंदल यांच्याकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागत असल्याचं दिसतंय. पण झी न्यूजनं जिंदल यांनीच आपल्याला लाच देऊ केली, असं स्पष्टिकरण दिलं आहे.

जिंदल यांनी झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादर समीर अहलुवालिया यांच्यासोबत 13, 17 आणि 19 सप्टेंबरला आपल्या कंपनीच्या लोकांसोबत बैठक झाली होती या बैठकीत त्यांनी ही मागणी केली. याचे स्टिंग ऑपेरशन करण्यात आलं होतं ते व्हिडिओ फूटेज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केलं. तसेच हे स्टिंग थांबवण्यासाठी 100 कोटींची मागणी केली जर हे स्टिंग थांबवले नाही तर बदनामी करू अशी धमकीही झी न्यूजने दिली अशी माहितीही जिंदल यांनी दिली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे एक जिंदल यांनी तक्रार दाखल केली आहे. माझ्या सारख्या अनेक लोकांना अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग केलं जातं आणि वरतून चोराच्याच उलट्या बोंबा असं काही होतं त्यामुळे मला पुढं यावं लागलं असंही जिंदल म्हणाले.

First published:

पुढील बातम्या