मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बलुचिस्तानमधल्या पोलीस सेंटरवर हल्ला, 60 ठार

बलुचिस्तानमधल्या पोलीस सेंटरवर हल्ला, 60 ठार

Quetta police training center

25 ऑक्टोबर :  बलुचिस्तानची राजधानी क्वेटा इथल्या पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 60 ठार, तर 100हून अधिक जण जखमी झाले आहेत. हल्ल्यात ठार झालेले सर्व जण प्रशिक्षण घेण्यासाठी आले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी तालिबानने घेतली आहे.

क्वेटा शहरातील उपनगरात असलेल्या ट्रेनिंग सेंटरवर ४ दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी सेंटरजवळ आधी 2 स्फोट केले. त्यानंतर दहशतवाद्यांनी सेंटरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना रोखल्याने त्यांनी गोळीबार करयला  सुरुवात केली. या गोळीबारात अनेक जण ठार झाले. गोळीबारापासून वाचण्यासाठी काहींनी इमारतीवरून उडी मारल्याने तर काही जण भिंत चढताना जखमी झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. हल्ल्यावेळी सेंटरमध्ये २५० विद्यार्थी होते.

बलुचिस्तानचे गृहमंत्री मीर सरफराज मोहम्मद बुगती यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. मात्र, पाक लष्कराने ६ दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: Pakistan, Terrorism, बलुचिस्तान