07 फेब्रुवारी : नंदुरबारमधील बनावट लाभार्थी प्रकरणात राज्य सरकारने वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनां क्लिन चीट दिलीए. तर त्याच प्रकरणात 45 सरकारी कर्मचारी आणि अधिकार्यांविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
बनावट लाभार्थी प्रकरणात नंदुरबार ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये विजयकुमार गावीत यांच्यासह संबंधितांविरोधात 7 गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, गावीत मंत्रिमंडळात असल्याने त्यांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी मंत्रिमंडळाची परवानगी आवश्यक होती.
गेल्या 10 वर्षांपासून हा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे पडून होता. शेवटी निवडणूक तोंडावर असताना मंत्रिमंडळाने याबाबतचा निर्णय घेतलाय. गावितांविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी परवानगी नाकारल्याचे सरकारी वकिलांना आज (शुक्रवारी) न्यायालयापुढे सांगितलं. त्याचवेळी या प्रकरणातल्या 45 सरकारी कर्मचार्यांविरोधात मात्र दोषारोपपत्र दाखल करण्यास सरकारनं परवनागी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.