मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बजेटमध्ये बळीराजासाठी काय ?

बजेटमध्ये बळीराजासाठी काय ?

budget_farmer2301 फेब्रुवारी :  शेतकऱ्याचं उत्पन्न दुपट्टीने वाढवणार अशी ग्वाही देत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 'चला गावाकडे' नारा दिलाय. मनरेगा योजनेसाठी 48 हजार कोटीची भरीव तरतूद करुन  या योजनेतून 10 लाख तलावांची निर्मिती करणार असल्याचं जेटली यांनी सांगितलं.  तसंच शेतक-यांना कर्जवाटप करण्यासाठी अर्थसंकल्पात १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल कोणतीही घोषणा बजेटमध्ये करण्यात आली नाही.

शेतीसाठी

ग्रामपंचायतींना ब्राॅडबँडनं जोडणार

गावांमध्ये महिला शक्ती केंद्र उभारणार

आंगणवाडीत महिलांना स्वयरोजगार शिक्षण देण्यासाठी 5000कोटींची तरतूद

गावांमध्ये पाईपने पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष निधी

देशात 100 टक्के वीज 1 मे 2018 पर्यंत पोहचणार

ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे

2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद, 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवली

ग्रामविकासासाठी 3 लाख कोटी रुपये खर्च करणार

मनरेगासाठी 48000 कोटी

मनरेगा योजनेतून 10 लाख तलावांतची निर्मिती करणार

1 मे 2018 पर्यंत सर्व गावांमध्ये वीज 4140 कोटींची तरतूद

कृषी विम्याची रक्कम दुप्पट करणार

डेअरी प्रोसेसिंग इंन्फ्रास्ट्रक्चर साठी निधी

पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फसल बीमा योजना - 5500 कोटींचं अनुदान

शेतक-यांना कर्जवाटप करण्यासाठी अर्थसंल्पात १० लाख कोटींची तरतूद

यंदा कृषी विकासदर ४.१ टक्के राहील असा अंदाज.

सहकारी संस्थांच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणार

३ वर्षात नाबार्डसाठी २० हजार कोटींची तरतूद

ठिबक सिंचनासाठी अतिरिक्त ५००० कोटींची तरतूद.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: Union budget, अरुण जेटली, शेतकरी