मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /बजेटमध्ये ठोस काहीच नाही -मनमोहन सिंग

बजेटमध्ये ठोस काहीच नाही -मनमोहन सिंग

    Manmohan singh

    10 जुलै : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी आज (गुरुवारी) आपलं बजेट संसदेत सादर केलं. मोदी सरकार सत्तेत आल्यावर हे त्याचं पहिलंच बजेट आहे. या बजेटवर काँग्रेसने टीका केलीय. रेल्वे बजेट प्रमाणेच हेच बजेट असून ठोस असं काहीच नाही अशी टीका माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी केली आहे. तसंच बजेटमध्ये जेटलींनी ठेवलेलं लक्ष्य मोदी सरकार कसं साध्य करेल, असा सवालही सिंग यांनी विचारलाय. तसंच या बजेटमध्ये कोणताही रोडमॅप नाहीये. रेल्वे बजेटसारखंचं या बजेटमध्येही ठोस असं काहीचं नसल्यांचं त्यांनी म्हटलं आहे.

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    [if0] [sc0]

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    First published:

    Tags: Income tax, Manmohan singh, Narendra modi, NDA, Petrol, Tax