मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

फ्लॅशबॅक 2015 : सरतं वर्ष ठरलं समाजव्यवस्थेला आव्हान देणारं पण...

फ्लॅशबॅक 2015 : सरतं वर्ष ठरलं समाजव्यवस्थेला आव्हान देणारं पण...

" isDesktop="true" id="198191" >

2015 या वर्षात राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींसोबत घडलेल्या सामाजिक घटना, त्यातुन निर्माण झालेले काही प्रश्न, झालेले सामाजिक बदल याविषयीचा आमचा हा फ्लॅशबॅक 2015...

Social Affairs

दुष्काळाच्या दुष्टचक्रात शेतकरी

विदर्भ आणि मराठवाड्याला गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागतोय. याच वर्षाच्या सुरुवातीला राज्यात भाजप आणि शिवसेनेनं अनेक नाट्यमय घडामोडींनंतर सत्ता स्थापन केली. शेतकर्‍यांना याहीवर्षी उशीराने पडलेल्या पावसाचा, त्यामुळे उद्भवलेल्या पाण्याच्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागतोय. शेतक-याच्या हातात खरीपाचं पीक नाही आणि रब्बीचंही पीक नाही, प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही.जनावरं मरु लागली. शेतकरी यासगळ्या परिस्थितीने खचून गेला. यावर्षभरातला शेतकरी आत्महत्येचा आकडा हजारांच्या घरात आहे. केंद्राकडून उशीरानं मिळालेली मदत, राज्य सरकारकडुनही मिळालेली तुटपूंजी मदत शेतकर्‍यांच्या मनात उमेद निर्माण करु शकली नाही. त्यामुळे अजुनही आत्महत्येचं प्रमाण कमी झालेलं नाही, उत्पादनात प्रचंड घट होतेय आणि सगळ्यांत गंभीर प्रश्न चर्चेत आला तो म्हणजे वातावरणातल्या अनियमिततेचा..त्यावर मात करण्याकरता राज्य सरकारने शेतक-यांसाठी दिर्घकालीन योजना राबवण्याचा वायदा केलाय. पण शेतकर्‍यांसाठी परिस्थिती सुखावह आहे असं अजिबात म्हणता येणार नाही.

जातपंचायतीच्या जाचातून मुक्तता

378_12_08_23_jatpanchayat

जात पंचायतीची पाळमुळं महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून रुजलेली पाहायला मिळतात. महाराष्ट्र अनेक जाती आणि समाजांचा मिळुन बनला आहे. आपापसातले वाद, भांडणं आणि प्रश्न मिटवण्यासाठी अगदी ब्रिटीशकाळापूर्वीपासून या जात पंचायती अस्तित्वात होत्या. ज्यावेळी न्यायलयं अस्तित्वात नव्हती तेव्हापासून या जात पंचायती अस्तित्वात आल्या. त्या-त्या समाजासाठी नियम बनवण्याचं, भांडणं सोडवण्याचं, चुका दाखवण्यासाठी या जातपंचायती असत. पण समाज बदलला, लोकांना योग्य-अयोग्य, न्याय-हक्काच्या गोष्टी कळु लागल्या आणि जातपंचायतीच्या माध्यमातून शिक्षा सुनावणे, कुटुंबांना बहिष्कृत करणे याला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला. जातपंचायत विरोधी विधेयक संमत झालं त्यामाध्यमातून जात पंचायतींच्या माध्यमातून होणा-या जाचाला चाप बसला. कारण या कायद्याअंतर्गत जातपंचायतींच्या निर्णयांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. या वर्षभरात अनेक जातपंचायतींनी स्वतःहून आपल्या समाजाच्या जात पंचायती बंद केल्या. हा एक अत्यंत महत्त्वाचा सकारात्मक बदल म्हणावा लागेल.

शनिशिंगणापूर महिला दर्शन प्रकरण

Shani-Shingnapur-925615528s

शनीचं अहमदनगर जिल्ह्यातलं प्रसिद्ध मंदिर शनी शिंगणापूर....या मंदिरात चौथ-यावर महिलांना प्रवेश नाही. ही प्रथा याठिकाणी अनेक वर्षांपासून पाळली जाते. पण नोव्हेंबरमध्ये एक तरुणी भर गर्दीत चौथ-यावर चढली आणि तिने शनीच्या शिळेवर तेलाचा अभिषेकही केला. त्यानंतर मात्र महाराष्ट्रात गदारोळ झाला. 'ती 'चौथ-यावर चढली म्हणुन शनीला दुग्धाभिषेक घालण्यात आला. आणि मग मात्र महिलावर्गातून प्रक्षोभ पहायला मिळाला. घटना घडल्यानंतरच्या रविवारी नगर बंदची हाकही देण्यात आली होती. उर्वरित राज्यातल्या महिला या 'काय झालं महिलेनं चौथ-यावर जाऊन दर्शन घेतलं तर?' असं म्हणत होत्या तर शिंगणापूरमधल्या महिला मात्र महिलेने चौथ-यावर जाऊन दर्शन घेण्याच्या विरोधात होत्या. बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही 'मला यात महिलांचा अपमान वाटत नाही' अशी ्‌प्रतिक्रिया देऊन रोष ओढावून घेतला होता.

शबरीमला विश्वस्त वक्तव्य प्रकरण

home_banner

केरळमधलं प्रसिद्ध ठिकाण शबरीमला..शबरीमलाच्या विश्वस्त पदावर नव्याने निवडून गेलेले त्रावणकोर देवास्वाम यांनी महिलांच्या दर्शनासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आणि सार्‍या जगाच्या आणि विशेषकरुन महिलांच्या टिकेचे ते धनी झाले.महिलांना दर्शन घेण्यापूर्ली, पाळी आली आहे का, हे स्कॅन करणारं मशीन लावण्याची मुक्ताफळं देवास्वाम यांनी उधळली होती. पाळीवरुन महिला पवित्र का अवित्र हे ठरणार आणि त्यावरुन तीला मंदिर प्रवेश द्यायचा का नाही हे ठरवणार्‍या सगळ्यांनाच एका मोठ्या वर्गाच्या रोषाला सामोरं जावं लागलं.त्यावरुन राज्यातलंच नव्हे देशातलं वातावरण ढवळून निघालं.

हॅपी टू ब्लीड कॅम्पेन

p038zk77

शबरीमलाच्या विश्वस्तांनी मुक्ताफळं उधळल्यानंतर महिला वर्गातून मोठ्या प्रमाणात नाराजी, राग, रोष आणि संताप व्यक्त झाला. यातुनच फेसबुकवरुन सुरु झालं हॅपी टू ब्लीड कॅम्पेन...दिल्लीच्या माध्यमात काम करणार्‍या गीता पाण्डेने...पाळी संदर्भात अनेकांच्या मनात TABOO असतो, त्याविषयी सहसा चारचौघात बोललं जात नाही. पण या कॅम्पेनला फेसबुकवर लाखो-करोडो महिलांनी पाठिंबा दिला. हातात हॅपी टू ब्लीडचे पोस्टर्स घेऊन अनेक तरुणींना फेसबुकवर आणि प्रत्यक्षातही या मोहीमेत सक्रीय सहभाग नोंदवला. शबरीमलाच्या विश्वस्तांवरचा राग व्यक्त करण्यापुरतं हे कॅम्पेन नव्हतं तर महिलांना असं स्कॅनरने 'राईट टाईम' ठरवता येणार नाही. आम्हाला हवं तेव्हा आणि हवं तिथे जाता यायला हवं. तो आमचा अधिकार आहे हे जोरकरपणे सांगण्यासाठी ही मोहीम होती. काही प्रमाणात पुरुषवर्गाकडूनही या बेधडक मोहिमेची प्रशंसा झाली.

स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ वादात

radhe-maa-l

2013 पासून धार्मिक गुरू आसाराम बापू तुरुंगात आहेत. आणि 2015 यावर्षाच्या जुन, जुलै आणि त्यानंतरचे काही महिना गाजले ते स्वयंघोषित धार्मिक गुरू राधे माँ मुळे. राधे माँ हे भारतातलं एक मोठं प्रस्थ हे यानंतर समोर आलं. राधे माँ उर्फ निकी गुप्ता, तिचा नवरा मिळुन पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. हुंडा मागणे, आश्रमात काम करण्यासाठी दबाव टाकणे, त्यासाठी मारझोड करण्याचा गुन्हा राधेमाँवर दाखल झाला आणि चौकशी दरम्यान अनेक गोष्टी उघड झाल्या. तीचं वागणं, भक्तांना फसवणं, आकर्षीत करणं, तिचा करोडोंचा दरबार यागोष्टी समोर आल्या. अभिनेत्री डॉली बिंद्राकडूनही राधे माँवर आरोप झाले. राधे माँचे दरबारातले नाचतांनाचे व्हिडीओ व्हायरल झाले. अशा घटना सावध राहाण्यासाठीची घंटा ठरतात, ठरल्या.

पर्युषण काळात गोमांस विक्री बंदी?

Congress Protest

गोमांस विक्री बंदीचा मुद्दा यावर्षात प्रचंड गाजला. गोमांस विक्रीला पर्युषण काळात एक दिवसासाठी बंदीचा निर्णय मुळचा 1984चा पुर्यषण काळात जीव ह्‌त्येला बंदी असावी असा जैन धर्मियांचं म्हणणं होतं त्यामुळे हा निर्णय काँग्रेसचा काळात घेतला गेला. 2004 साली विलासराव देशमुखांच्या काळात एक दिवसाची बंदी 2 दिवसांची करण्यात आली होती. पण 2015 च्या सुरवातीच्या महिन्यात हा मुद्द्ा खुपच तापला.2015 मध्ये केंद्रात एडीएचं आणि राज्यात सेना-भाजपचं सरकार आल्यावर पर्युषणकाळातली 2 दिवसांची बंदी वाढवून ती 4 दिवस करावी असा प्रस्ताव भाजपच्या काही नेत्यांनी महापालिकेकडे पाठवला. यावेळी 2004 ची बंदी संपूर्ण राज्यात लागू झाली होती ती वाढवावी असं सांगतांना महापालिकेच्या सभागृहाला डावलण्यात आलं.दरम्यान मीरा भाईंदर महापालिकेने ती बंदी 7 दिवासंची केल्यानं वाद चिघळला. मुंबईत सत्ताधारी सेनेला विश्वासात न घेता आयुक्तांमार्फत आपले मनसुबे साध्य करायला निघालेल्या भाजपवर सेना चिडली. हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं, पर्युषण काळातअतिरिक्त दोन दिवसांची बंदी टिकली नाही. अजुनही हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

अरुणा शानबागची मृत्यूशी झुंज संपली

Aruna-Shanbaug

अरुणा शानबागची 18 मे 2015 ला मृत्यूशी झुंज संपली. 1973 ला तिच्यासोबत घडलेल्या घटनेमुळे आणि तिच्यासाठी दयामरणाच्या केलेल्या मागणीमुळे ती जास्त चर्चेत राहीली. मूळच्या कर्नाटकातल्या उत्तर कन्नडच्या हल्दीपूर मधुन डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन आलेली अरुणा शानहाग. केईएममध्ये ज्युनियर नर्स म्हणुन ती काम करत होती. 1973 मध्ये वॉर्डबॉय सोहनलाल वास्मिकी याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि कुत्र्याला बांधण्यात येणा-या साखळीने त्या वॉर्डबॉयने अरुणाचा गळा आवळला.यात तिच्या मेंदुवर प्रचंड आघात झाला आणि ती कोमात गेली. 42 वर्ष ती कोमात होती आणि केईएमच्या इतर नर्सनी तिची घरच्या व्यक्तिसारखी इतकी वर्ष काळजी घेतली. दरम्यान तिच्यासाठी दयामरणाची याचिका करण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने शेवटपर्यंत तीला दयामरण दिलं नाही.

दहशतवादी याकुब मेमनला फाशी

IndiaTv7daf8c_YakubMemon

1993 साली मुंबईत झालेल्या स्फोटांतला मुख्य आरोपी याकुब अब्दुल रझ्झाक मेमनला नागपुरच्या सेंट्रल जेलमध्ये 30 जुलै 2015 ला फाशी देण्यात आली. भायखळा परिसरात लहानाचा मोठा झालेला, चार्टड अकाऊंटंट असलेला याकुब हा मुंबईच्याच मुळावर उठला. 93 च्या ब्लास्टमध्ये त्याचा सक्रिय सहभाग समोर आला आणि त्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा देण्यात आली. या फाशीमुळे मात्र देशभरात उलट सुलट चर्चांना उधाण आलं. भाजप सरकारने जाणिवपूर्वक फाशी दिली, याकुबने ब्लास्टचा प्लान आणि त्यात सहभागी असलेल्यांची नाव पोलिसांना दिली होती, मग त्याला माफीचा साक्षीदार का नाही केलं. याकुबच्या फाशीच्या सुनावणी दरम्यान पहिल्यांदाच मध्यरात्री विशेष न्यायालय भरवून त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शेवटचं शिक्कामोर्तब झालं आणि 30 जुलैला त्याला फाशी दिली गेली. त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केला गेला आणि तो मुंबईतही आणला गेला. यावेळी भायखळा-मस्जिद परिसरात लाखोंच्या संख्येनं गर्दी जमली होती याकुबच्या दर्शनासाठी. कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आणि सगळं शांततेत पार पडलं. एका दहशतवाद्याच्या मृतदेहाला पाहायला इतकी गर्दी का, भाजपने आपला अजेंडा राबवला अशा चर्चा झडत होत्या पण सगळ्यात मोठं लोकशाहीचं दर्शन याकुबच्या फाशीनंतर पाहायला मिळालं हेही विसरता येणार नाही.

अजूनही समलैंगिग संबंधाना मान्यता नाही

INDIA_Gay_1414_feature

2002 पासुन लढा सुरु होता तो 377 कलमासाठी, म्हणजेच समलैंगिग संबंधांना कायद्यानं मान्यता मिळावी यासाठी लढा सुरु होता. तो अजुनही सुरूच आहे. नाझ फाऊंडेशनने यासंदर्भात पहिल्यांदा जनहित याचिका दाखल केली होती. पण लढा सुरू राहिला. जर समलैंगिक संबंधांना मान्यता मिळाली तर त्याचे विपरीत परिणाम होती, समाजमन अस्वस्थ होईल, संस्कृतीला बाधा येईल अशा मुद्यांवर विरोध होत राहिला. तर कोणासोबत आयुष्य काढायचा हा निर्णय आमचा आम्हाला घेऊ द्यायला हवा, आम्हाला आमचा जोडीदार कोण आहे हे निवडण्याचं स्वातंत्र्य हवं असा समलैंगिक संबंध असणा-यांकडून आणि त्यांच्यासाठी काम करणा-यांकडून होत राहिला. काही नियम आणि अटींनंतर काही काळासाठी याला मान्यता देण्यावर सकारात्मक विचारही झाला. पण काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी 18 डिसेंबर 2015 ला समलैंगिक संबंधांना मान्यता देणारं खासगी विधेयक संसंदेत मांडलं पण केंद्र सरकारने ते हाणुन पाडलं.त्यानंतर जंतंरमंतर पासून ते अगदी प्रमुख शहरांच्या अनेक रस्त्यावर आणि मैदानांवर समलैंगिक संबंधांना पाठिंबा देणारे, आणि संबंध असणा-यांनी खुप मोठ्‌या प्रमाणात आंदोलन करुन आपला निषेध नोंदवला होता.

21 जुन 'इंटरनॅशनल योगा डे'

modi19

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने दरवर्षी 21 जुन चा दिवस हा इंटरनॅशनल योगा डे म्हणुन साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. आणि पहिला 21 जुन 2015 चा इंटरनॅशनल डे देशभर साजरा करण्यात आला. केंद्राच्या नव्यान ेतयार करण्यात आलेल्या आयुष या खात्याकडून इंटरनॅशनल योगा डे साठी पाठपुरावा केला गेला आणि पहिल्या योगा डे साठीची तयारीही याच खात्याअंतर्गत करण्यात आली होती. नवी दिल्लीच्या राजपथावर 35 मिनीटं योगासनं करण्यात आली. त्यासाठी राज्यभरातल्या वेगवेगळ्या शाळा-कॉलेजच्या 36 हजार विद्यार्थ्यांना इथं आमंत्रित करण्यात आलं होतं. यासगळ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही योगासनं केली. याची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्येही करण्यात आली.

बाजीरावचा इतिहास बदलण्यावर आक्षेप

story39

2015 च्या शेवटच्या महिन्यात संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव मस्तानी हा सिनेमा आणला. चित्रपट आणि वाद हा काही नवा विषय नाहीच. पण बाजीराव पेशव्यांच्या आयुष्याविषयी भाष्य करणारा हा चित्रपट गाजला तो इतिहास का बदलला जातोय, आपल्या पुढच्या पिढीला आपण खोटा इतिहास दाखवणार का या मुद्यावरून..पण सिनेमॅटिक लिबर्टीच्या 'इतिहास बदलला कसा' यावरून तीव्र आंदोलन, वाद-विवाद या महाराष्ट्राने पाहिला आहे त्यातुलनेत या चित्रपटाला कमी विरोध झाला. पेशव्यांच्या वंशजांनी चित्रपटातल्या पिंगा या गाण्यावर आक्षेप घेतला आणि हे गाणं काढून टाकावं अशी मागणी केली पण त्या मागणीकडे भन्साळी यांनी लक्ष दिलं नाही. या चित्रपटाच्या आशयाबाबत अनेक कलाकार, दिग्दर्शकांना आपली मतं मांडली. समाजातून एक वर्ग होता जो दाखवलेल्या चुकीच्या इतिहासाच्या तीव्र विरोधात होता. आणि एक वर्ग असा होता तो चित्रपट चांगला आहे असं म्हणतो आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

[if1] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Yoga day