Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

फरार बुकींना डी गँगने दिला दुबईत आश्रय ?

मुंबई 28 मे : आयपीएलचा हंगाम संपला खरा पण मैदानाबाहेरचा 'स्पॉट फिक्सिंग'चा सामना अजूनही सुरू आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचे दररोज नव-नवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहे. सट्टेबाजांचे संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचं मुंबई क्राईम ब्रँचच्या तपासात उघड झालंय. फरार बुकी पवन जयपूर, संजय जयपूर, किशोर पुणे हे दुबईला पळून गेले असून हे सर्व बुकी अंडर वर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या संपर्कात होते. तसंच या सर्व बुकींना दुबईत दाऊद गँगने आश्रय दिला अशीही धक्कादायक माहिती पुढे येतेय. बुकी संजय आणि पवनला पळून जाण्यासाठी विंदू दारा सिंगनं मदत केल्याचं चौकशीतून समोर आलंय. 16 मे रोजी भारतीय क्रिकेट विश्वाला एकच हादरा बसला. दिल्ली पोलिसांनी आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचं पुराव्यानिशी जगासमोर आणलं. या प्रकरणी राजस्थान रॉयलचे खेळाडू एस.श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिलाला अटक करण्यात आली. खेळाडूंच्या अटकेअगोदर रमेश व्याससह अन्य बुकींना अटक करण्यात आली. बुकींच्या कबुली जबाबवरून खेळाडूंना अटक करण्यात आली. या प्रकरणात अंडरवर्ल्डचा हात असेल असा पोलिसांना संशय होता मात्र त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. पण बुकींचे संबंध थेट अंडरवर्ल्डशी असल्याचं तपासातून उघड झालंय. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या चंद्रेश या बुकीचे दुबईमध्ये असलेल्या सुनील अभिचंदानी उर्फ सुनील दुबई या बुकीशी संबंध असल्याचं तपासात उघड झालंय. आता हाच सुनील दुबई गँगस्टर छोटा शकीलच्या सांगण्यावर काम करत होता हे स्पष्ट झालं. बुकींचे पाकिस्तान कनेक्शन देशभरात बुकींचे अटक सत्र सुरू झाल्यामुळे 25 ते 30 बुकींनी दुबईला पलायन केलं. या बुकींना डी गँगने आश्रय दिलाआहे. त्यांना मदत करत आहे. डी गँगने आयपीएल सुरू होण्याअगोदरच ही यंत्रणा उभी केली होती. कोणता बुकी कुठे, काम करणार याचे नियोजन अगोदरच करण्यात आलं होतं. एव्हान रमेश व्यास या बुकीला ज्या लाईन देण्यात आल्या होत्या. त्याद्वारे पाकिस्तानातील बुकी भारतातील बुकींशी संपर्कात होते. या सर्व बुकींवर डी गँगचे कंट्रोल होते यावरून हे स्पष्ट झालंय. या प्रकरणातील बुकी सुनील दुबई हा छोटा शकीलशी संपर्कात होता. अटकेत असलेल्या आरोपी रमेश व्यासकडे 30 टेलिफोन लाईन्स सापडल्या होत्या. या लाईन्स पाकिस्तानी बुकींना जोडून दिल्या होत्या. रमेश व्यासच्या माध्यमातून पाकिस्तानातले बुकी या टेलीफोन लाईन्सच्या माध्यमातून किशोर पुणे याच्याकडे सट्टा लावत होते. किशोर पुणे हा सध्या फरार झाला. विंदूला 31 मेपर्यंत पोलीस कोठडीदरम्यान, हायकोर्टाने अभिनेता विंदू दारा सिंग, अल्पेश पटेल आणि प्रेम तनेजा यांची 31 मे पर्यंत पोलीस कोठडी वाढविली आहे.विंदू दारा सिंगला आज मुंबई हायकोर्टात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयीन कोठडी व जामीन मिळवण्याचा विंदूचा प्रयत्न होता परंतु पोलिसांनी त्याची पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. या तिघांचीही पोलीस कोठडी आज संपली होती. श्रीसंत, चंडिलाला 4 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेल्या श्रीसंत, चंडिलाला 4 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठवण्यात आली आहे. आज कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी वाढवण्याची दिल्ली पोलिसांची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळून लावत श्रीसंत आणि अजित चंडिलाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या दोघांनाची तिहार तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे. तर अटकेत असलेल्या अंकित चव्हाणचा जामीन अर्जही कोर्टाने फेटाळला आहे. 2 जूनला अंकितचं लग्न असल्याने त्याने जामीन अर्ज केला होता.

पुढे वाचा ...

मुंबई 28 मे : आयपीएलचा हंगाम संपला खरा पण मैदानाबाहेरचा 'स्पॉट फिक्सिंग'चा सामना अजूनही सुरू आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचे दररोज नव-नवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहे. सट्टेबाजांचे संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचं मुंबई क्राईम ब्रँचच्या तपासात उघड झालंय. फरार बुकी पवन जयपूर, संजय जयपूर, किशोर पुणे हे दुबईला पळून गेले असून हे सर्व बुकी अंडर वर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या संपर्कात होते. तसंच या सर्व बुकींना दुबईत दाऊद गँगने आश्रय दिला अशीही धक्कादायक माहिती पुढे येतेय. बुकी संजय आणि पवनला पळून जाण्यासाठी विंदू दारा सिंगनं मदत केल्याचं चौकशीतून समोर आलंय.

16 मे रोजी भारतीय क्रिकेट विश्वाला एकच हादरा बसला. दिल्ली पोलिसांनी आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचं पुराव्यानिशी जगासमोर आणलं. या प्रकरणी राजस्थान रॉयलचे खेळाडू एस.श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिलाला अटक करण्यात आली. खेळाडूंच्या अटकेअगोदर रमेश व्याससह अन्य बुकींना अटक करण्यात आली. बुकींच्या कबुली जबाबवरून खेळाडूंना अटक करण्यात आली. या प्रकरणात अंडरवर्ल्डचा हात असेल असा पोलिसांना संशय होता मात्र त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. पण बुकींचे संबंध थेट अंडरवर्ल्डशी असल्याचं तपासातून उघड झालंय. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या चंद्रेश या बुकीचे दुबईमध्ये असलेल्या सुनील अभिचंदानी उर्फ सुनील दुबई या बुकीशी संबंध असल्याचं तपासात उघड झालंय. आता हाच सुनील दुबई गँगस्टर छोटा शकीलच्या सांगण्यावर काम करत होता हे स्पष्ट झालं.

बुकींचे पाकिस्तान कनेक्शन

देशभरात बुकींचे अटक सत्र सुरू झाल्यामुळे 25 ते 30 बुकींनी दुबईला पलायन केलं. या बुकींना डी गँगने आश्रय दिलाआहे. त्यांना मदत करत आहे. डी गँगने आयपीएल सुरू होण्याअगोदरच ही यंत्रणा उभी केली होती. कोणता बुकी कुठे, काम करणार याचे नियोजन अगोदरच करण्यात आलं होतं. एव्हान रमेश व्यास या बुकीला ज्या लाईन देण्यात आल्या होत्या. त्याद्वारे पाकिस्तानातील बुकी भारतातील बुकींशी संपर्कात होते. या सर्व बुकींवर डी गँगचे कंट्रोल होते यावरून हे स्पष्ट झालंय. या प्रकरणातील बुकी सुनील दुबई हा छोटा शकीलशी संपर्कात होता. अटकेत असलेल्या आरोपी रमेश व्यासकडे 30 टेलिफोन लाईन्स सापडल्या होत्या. या लाईन्स पाकिस्तानी बुकींना जोडून दिल्या होत्या. रमेश व्यासच्या माध्यमातून पाकिस्तानातले बुकी या टेलीफोन लाईन्सच्या माध्यमातून किशोर पुणे याच्याकडे सट्टा लावत होते. किशोर पुणे हा सध्या फरार झाला.

विंदूला 31 मेपर्यंत पोलीस कोठडीदरम्यान, हायकोर्टाने अभिनेता विंदू दारा सिंग, अल्पेश पटेल आणि प्रेम तनेजा यांची 31 मे पर्यंत पोलीस कोठडी वाढविली आहे.विंदू दारा सिंगला आज मुंबई हायकोर्टात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयीन कोठडी व जामीन मिळवण्याचा विंदूचा प्रयत्न होता परंतु पोलिसांनी त्याची पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. या तिघांचीही पोलीस कोठडी आज संपली होती.

श्रीसंत, चंडिलाला 4 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेल्या श्रीसंत, चंडिलाला 4 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठवण्यात आली आहे. आज कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी वाढवण्याची दिल्ली पोलिसांची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळून लावत श्रीसंत आणि अजित चंडिलाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या दोघांनाची तिहार तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे. तर अटकेत असलेल्या अंकित चव्हाणचा जामीन अर्जही कोर्टाने फेटाळला आहे. 2 जूनला अंकितचं लग्न असल्याने त्याने जामीन अर्ज केला होता.

First published: