26 ऑक्टोबर : राज्यातील भाजप सरकार हे कामकाजात नापास झाल आहे, ते ग्रेस पास सुद्धा होणार नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. सांगलीमध्ये चव्हाण आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सरकार हे दिशाहीन आणि असंवेदनशील असून, 'कुठे आहे महाराष्ट्र माझा' अशी दुदैर्वी अवस्था निर्माण झाली आहे. राज्यातील क़ायदा आणि सुव्यवस्था तर फारच वाईट झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
आंदोलनाची स्टंटबाजी करने ही भाजपा शिवसेनेची पद्धत आहे, आमची नाही, असे सांगून चव्हाण पुढे म्हणाले, लोकशाही पद्धतीने आम्ही विरोधी पक्षाची भूमिका व्यवस्थित पार पाड़त आहे.
राज्यातील सरकार हे किती दिवस टिकेल हा प्रश्न सर्वांना पडला आहे. सत्तेतील घटक पक्षच बाहेर सरकार विरोधी बोलत आहेत, ते एकमेकांना काळ फासण्याच काम करत आहेत असंही चव्हाण म्हणाले.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashok chavan, BJP, अशोक चव्हाण, काँग्रेस, प्रदेशाध्यक्ष