01 जानेवारी : नव्या वर्षात फडणवीस सरकारने धडाक्यात कामाला सुरुवात केलीये. फडणवीस सरकारने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या माजी मंत्र्यांची सरसकट सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, आर.आर.पाटील, काँग्रेसचे नेते नारायण राणे, बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, अशोक चव्हाण, जयंत पाटलांची सुरक्षा जाणार आहे.
हिवाळी अधिवेशनात विरोधकांना सडेतोड उत्तर दिल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा समाचार घेण्यास सुरुवात केलीये. अगोदरच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा खात्यांतील गैरव्यवहार प्रकरणी आक्रमक भूमिका घेत आघाडी सरकारने निवडणुकांपूर्वी 1100 कोटींच्या निविदा रद्द केल्या असून चौकशीचे आदेश दिले आहे. आता मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था काढण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्र्यांसह सर्वच माजी मंत्र्यांसाठी हा निर्णय लागू होणार आहे. गेल्या 8 दिवसांपासून अनेक मंत्र्यांची सुरक्षा टप्प्याटप्प्यानं काढायला सुरुवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, आर आर पाटील, काँग्रेसचे नेते नारायण राणे, बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम, अशोक चव्हाण, जयंत पाटील, नसीम खान यांचा समावेश आहे. फडणवीस सरकारने कोणतीही हयगय न करता सरसकट सुरक्षा व्यवस्था काढण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीत नाराजी पसरली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.