मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

प्रभूंची 'कृपा' कुणावर ?

प्रभूंची 'कृपा' कुणावर ?

suresh prabhu_mahrashtraनवी दिल्ली - 24 फेब्रुवारी : एकीकडे मेक इन इंडियाचा जयघोष तर दुसरीकडे दादरी, पुरस्कारवापसी, रोहित वेमुला आणि जेएनयू प्रकरणामुळे टीकेचं धनी झालेलं मोदी सरकार आता अग्निपरिक्षेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू  गुरुवारी आपलं दुसरं रेल्वे बजेट सादर करणार आहे. त्यामुळे प्रभूंची कृपा कुणा कुणावर असणार हे पाहण्याचं ठरणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू चालू वर्षांचा रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यामुळे साहजिकच रेल्वेमंत्री आपल्या पोतड्यातून कोणत्या घोषणा करता हे पाहण्याचं ठरणार आहे. मागील वर्षी सुरेश प्रभूंनी कोणतीही भाडेवाढ न करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. हायटेक आणि स्वच्छतेचा नारा देत नव नवीन घोषणा केल्या होत्या. मात्र, मध्यंतरी मुंबई लोकल पासची भाडेवाढ आणि लांबपल्ल्यांच्या तिकीट दरात वाढ करून 'प्रभू एक्स्प्रेस'ने धक्का दिला होता.  रेल्वे प्रवासात छुपी भाडेवाढीचा हिशेब आणि मागील वर्षी केलेल्या घोषणाचा लेखाजोखा प्रभू  मांडणार आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास बजेट सादर होणार आहे.  विशेष म्हणजे आधीच तोट्यात चालणार्‍या रेल्वेला नफ्यात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरेश प्रभूंवर ही जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे प्रभूंकडून मोदींनाही अपेक्षा आहेच.  मेक इन इंडिया, स्वच्छ भारत आणि पंतप्रधानांनी केलेल्या अनेक घोषणांची कास धरून 'प्रभू एक्स्प्रेस' अपेक्षांच्या स्थानकांवर थांबेल की नाही हे बजेटनंतरच कळेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: BJP, Union budget

पुढील बातम्या