01 जून : सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस स्टेशनच्या लॉकअपमधून तीन आरोपी पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तासगाव पोलीस स्टेशनचे पीआय रमेश बनकर यांच्या निवृत्तीसमारंभाचा कार्यक्रम रात्री 10 पर्यंत सुरू होता. सर्व पोलीस कर्मचारी या कार्यक्रमात होते त्याचा फायदा घेत कौलं काढून हे आरोपी पळाले.
राहुल माने, राजेंद्र जाधव आणि कुमार पवार अशी आरोपींची नावं आहेत. जबरी चोरीच्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. रविवारी रात्री जोरदार पाऊस आला होता आणि वीजही नव्हती, त्याचा फायदा घेत आरोपी पळाल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.