मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पेशावर हल्ल्यात 132 मुलांसह 141 ठार,9 अतिरेक्यांचा खात्मा

पेशावर हल्ल्यात 132 मुलांसह 141 ठार,9 अतिरेक्यांचा खात्मा

BRKING940_201412161349_940x355

UPDATE

पेशावर हल्ल्यात 132 मुलांसह 141 ठार,9 अतिरेक्यांचा खात्मा

पाकिस्तानातील पेशावरमधल्या एका लष्करी शाळेवर अतिरेक्यांनी भीषण हल्ला केलाय. त्यात 141 जणांचा मृत्यू झालाय. 132 मुलांचा यात समावेश आहे. तसंच अनेक मुलं जखमीही झाले आहेत. 9 फिदायीन गोळीबारात ठार झाल्याचं बोललं जातंय. एका अतिरेक्यांनं स्वतःला स्फोटकानं उडवलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 9 दहशतवादी या शाळेमध्ये घुसले होते.

 भारताच्या पराराष्ट्र मंत्रालयानं या हल्ल्याचा  केला निषेध

परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरूद्दीन यांनी ट्विटरवरून यांनी हा निषेध व्यक्त केला. "पेशावरमध्ये शाळेतल्या निरागस मुलांवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. अतिरेक्यांचा हा हल्ला अतिशय भयानक आहे. ज्या मुलांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटूंबियांप्रती आमची सहानुभूती आहे." अशी प्रतिक्रिया सय्यद अकबरूद्दीन यांनी दिली.

शांततेचा नोबल पुरस्कार विजेते कैलाश सत्यर्थी यांनी ट्विटवर प्रतिक्रिया दिली,

"पेशावरमध्ये शाळेत झालेल्या हल्ल्यात 100 हून जास्त मुलं मारली गेली. या पीडित कुटुंबीयांच्या दु:खात मी सामील आहे. मानवतेच्या इतिहासातला आज काळा दिवस आहे."

तहरिक-ए-तालिबाननं या हल्ल्याची जबाबदारी घेतलीय

तहरीक-ए-तालिबानबद्दल

- पाकिस्तानातल्या वायव्य सरहद्द प्रांतात या अतिरेकी संघटनेचे केंद्र आहे

- 2007 मध्ये जहाल विचारांच्या 13 गटांनी एकत्र तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानची स्थापना केली

- 2008 मध्ये या अतिरेकी संघटनेवर पाकिस्तान सरकारनं बंदी घातली

- पेशावरमधल्या अतिरेकी हल्ल्यात 130 जणांचा मृत्यू

- अतिरेकी हल्ल्यात 84 विद्यार्थ्यांचा मृत्यू

- 2 अतिरेकी ठार, एकानं स्वत:ला उडवलं

- हल्ल्यात अनेक लहान मुलं जखमी

- शाळेत 12 फिदायीन लपल्याची शक्यता

- वझिरीस्तानमधल्या कारवाईचा घेतला बदला

- तहरीक-ए-तालिबाननं घेतली जबाबदारी

- पाकिस्तानात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

- कारवाई अजुनही सुरू आहे

- शाळेत अजुनही काही अतिरेकी शाळेत लपलेले आहेत, पाकिस्तानच्या अधिकार्‍यांनी दिली माहिती

- मृत विद्यार्थ्यांची संख्या 20 वर, एक सुरक्षारक्षकही ठार - हॉस्पिटल प्रशासनाची माहिती

- तेहरिक- ए- तालिबानच्या हल्ल्यात ठार

- मुलांना आणि शाळेतल्या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढा

- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे लष्कर आणि प्रशासनाला आदेश

- एका दहशवाद्यानं स्फोटकाच्या साह्यानं स्वत:ला उडवलं

- आत्तापर्यंत चार चिमुरड्यांचा मृत्यू

- हा आत्मघातकी हल्ला जखमींची संख्या जास्त सर्च ऑपरेशन सुरू आहे. तालिबानविरूध्द आर्मीची कारवाई सुरू आहे. त्याचा बदला म्हणून हा हल्ला असू शकतो - अरीफ मलिक

- शाळेच्या परिसरात स्फोटांचेही आवाज

- पेशावरचं आर्मी पब्लीक स्कुल शाळेत दीड हजार मुलं

- शाळेच्या परिसरात स्फोटांचेही आवाज

- पेशावरमधल्या अतिरेकी हल्ल्यात 25 जण जखमी

- एक शिक्षकही जखमी

- पेशावरच्या लेडी रिडिंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

- पेशावरच्या हॉस्पिटलमध्ये आणीबाणी केली जाहीर

-  पेशावरमधील तेहरिक- ए- तालिबानच्या हल्ल्यात 17 जणं ठार, 40 जखमी

- पेशावरमधल्या अतिरेकी हल्ल्यात 25 जण जखमी

- पेशावरच्या हॉस्पिटलमध्ये आणीबाणी केली जाहीर

- पेशावरच्या लेडी रिडिंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

- एक शिक्षकही जखमी

- अतिरेक्यांनी 500 विद्यार्थ्यांना ठेवलं ओलीस

- गोळीबारात 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 19 जण जखमी,- तेहरिक- ए- तालिबाननं घेतली हल्ल्याची जबाबदारी

- शाळेच्या परिसरात जोरदार गोळीबार

- पाकिस्तान : पेशावरमधल्या आर्मी पब्लीक स्कुलमध्ये अतिरेकी घुसले

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

16 डिसेंबर :अतिरेक्यांचं माहेर घर बनलेल्या पाकिस्तानला आज त्याचीच किंमत चुकावी लागलीये. तालिबानी दहशतवाद्यांनी पेशावरमधील एका लष्करी शाळेवर आत्मघातकी हल्ला चढवला. या हल्ल्यात 141 जणांचा मृत्यू झालाय. यात 132 शाळकरी मुलं आणि 9 कर्मचार्‍यांचा ठार मारण्यात आलंय. तसंच अनेक मुलं जखमीही झाली आहेत. शाळेत घुसलेल्या नऊही अतिरेक्यांना ठार मारण्यात पाक लष्काराला यश आलंय. या हल्ल्याची जबाबदारी तहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेनं घेतलीय. अतिरेक्यांना लहान मुलांना मारण्याचे आदेश असल्याचं बोललं जातंय. वझिरीस्तानमधल्या कारवाईचा बदला घेतल्याचा दावा केलाय. या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Pakistan, Terror acttack, Terrorist attack, अतिरेक्यांचा हल्ला, पाकिस्तान, पेशावर.