31 जुलै : महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना पेट्रोलियम कंपन्यांनी धक्का दिला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलीटर 70 पैशांनी तर डिझेल प्रतिलीटर 50 पैशांनी महागलंय. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यानं दरवाढ करण्यात आलीय. रुपयाची घसरण झाल्यामुळे पेट्रोल आयात केलं जातंय त्याच्या किंमती महागल्या असल्यामुळे पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आलीय. मागिल महिन्यात 28 जुन रोजी 1.82 पैशांनी दरवाढ करण्यात आली होती. या दरवाढीला महिना पूर्ण होताच पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.