Home /News /news /

पेट्रोल 2 रुपयांनी स्वस्त

पेट्रोल 2 रुपयांनी स्वस्त

15 मार्चदिल्ली : महागाईने त्रस्त जनतेला पेट्रोलियम कंपन्यांनी दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2 रूपयांनी कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होणार आहे. आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरल्यामुळे पेट्रोलच्या दरात 2 रुपयांनी कपात करण्यात आल्याचं पेट्रोलियम कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे. स्थानिक कर वगळता ही कपात आहे. त्यामुळे पुण्यात पेट्रोल 2 रुपयांनी तर मुंबईत 2 रुपये 52 पैशांनी स्वस्त होणार आहे. डिझेलच्या दरात मात्र कोणतेच बदल पेट्रोलियम कंपन्यांनी केले नाहीत. याच महिन्यात 1 मार्च रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 1.40 पैशांनी वाढ केली होती. ही वाढ दुसर्‍यांदा होती. मात्र 15 दिवसानंतरच पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.पेट्रोल झालं स्वस्तआधीआता मुंबई77 रु. 66 पैसे 75 रु. 14 पैसे पुणे78 रु. 76 रु.नागपूर79 रु. 77 रु.

पुढे वाचा ...

15 मार्च

दिल्ली : महागाईने त्रस्त जनतेला पेट्रोलियम कंपन्यांनी दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2 रूपयांनी कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होणार आहे. आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरल्यामुळे पेट्रोलच्या दरात 2 रुपयांनी कपात करण्यात आल्याचं पेट्रोलियम कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे. स्थानिक कर वगळता ही कपात आहे. त्यामुळे पुण्यात पेट्रोल 2 रुपयांनी तर मुंबईत 2 रुपये 52 पैशांनी स्वस्त होणार आहे. डिझेलच्या दरात मात्र कोणतेच बदल पेट्रोलियम कंपन्यांनी केले नाहीत. याच महिन्यात 1 मार्च रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 1.40 पैशांनी वाढ केली होती. ही वाढ दुसर्‍यांदा होती. मात्र 15 दिवसानंतरच पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

पेट्रोल झालं स्वस्तआधीआता मुंबई77 रु. 66 पैसे 75 रु. 14 पैसे पुणे78 रु. 76 रु.नागपूर79 रु. 77 रु.

First published:

पुढील बातम्या