31 ऑक्टोबर : ऐन दिवाळीच्या तोंडावर पेट्रोलियम मंत्रालयाने एक सुखद आणि एक दुखद धक्का दिलाय. पेट्रोलच्या दरात 1.15 पैशांनी कपात करण्यात आली आहे तर डिझेलच्या दरात 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
गेल्या तीन महिन्यापासून महिन्याअखेरीस पेट्रोलियम मंत्रालयाने गुड न्यूज आणि बॅड न्यूज दिलीय. मागिल महिन्यात 30 सप्टेंबर रोजी पेट्रोलच्या दरात 3.05 पैशांनी कपात केली होती तर डिझेलच्या दरात 50 पैशांनी वाढ केली होती. डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेल्या घसरणीमुळे पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली होती.
त्यानंतर रुपयांची घसरण थोड्याप्रमाणावर थांबल्यामुळे पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आली. बुधवारीच पारीख समितीने डिझेलच्या दरात 5 रुपये, केरोसिनच्या दरात 4 रुपये आणि सिलेंडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ करण्याची शिफारस केलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.