Home /News /news /

पेट्रोलचे 2.35 तर डिझेल 50 पैशांनी महागले

पेट्रोलचे 2.35 तर डिझेल 50 पैशांनी महागले

petrol31 ऑगस्ट : रूपयाच्या घसरणीचा फटका आता सर्वसामान्यांना बसला आहे. पेट्रोलच्या दरात 2 रुपये 35 पैशांनी तर डिझेलच्या दरात 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. यापाठोपाठ स्वयंपाकाच्या गॅस आणि केरोसिनचीही दरवाढ होण्याची शक्यता आहे.

दोनच दिवसांपूर्वी पेट्रोलियम मंत्रालयाने दरवाढीचे संकेत दिले होते. मात्र ही दरवाढ संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर होण्याची शक्यता होती मात्र त्या अगोदरच ही दरवाढ करण्यात आली. डॉलरच्या तुलनेत रूपयाने नीच्चांक दर गाठलाय त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भरमसाठ वाढ झालीय.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 110 डॉलर प्रति बॅरेल झालीय. रुपयाची घसरण झाल्यामुळे पेट्रोल आयात केलं जातंय त्याच्या किंमती महागल्या असल्यामुळे पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आलीय. त्यामुळे याचा बोजा आता सर्वसामान्य माणसावर पडणार आहे. ठीक एक महिन्यापूर्वी म्हणजे 31 जुलै रोजीही पेट्रोलच्या दरात 70 पैशांनी तर डिझेलच्या दरात 50 पैशांनी वाढ करण्यात आली होती. पेट्रोल, डिझेलचे सध्याचे भाव

  • पेट्रोल - 78.47
  • डिझेल - 59.41

अंदाजे नवीन दर

  • पेट्रोल - 82.50
  • डिझेल - 60.20
First published:

Tags: Diesel, Diesel price hike, Petrol, Price hike, डिझेल

पुढील बातम्या