मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पुलवामामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

पुलवामामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रातिनिधिक छायाचित्र

Pulwama Terror Attack

09 मार्च :  जम्मू काश्मीरातील पुलवामा जिल्ह्यातील पडगमपुरा भागात आज (गुरूवार) सकाळपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या ठिकाणी 4-5 दहशतवादी घरात लपून बसल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

ही माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घालत हा संपूर्ण परिसर खाली केला आणि कारवाईला सुरूवात केली. हा परिसर श्रीनगर-जम्मू या राष्ट्रीय महामार्गापासून नजीकच्या अंतरावर आहे.

काही वेळापूर्वी  मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं आहे. या कारवाईत सीआरपीएफची १३० बटालियन, ५५ रायफल रेंजर्स आणि विशेष कृती दलाचे जवान सहभागी आहेत.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी देखील पुलवामातील त्राल परिसरात तीन ते चार दहशतवादी लपले होते. त्यावेळी झालेल्या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला होता. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु असताना तेथील स्थानिकांनी लष्कारवर दगडफेकही केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: Terror attack