ठाणे 21 जून : मुंब्य्रात लंकी कंपाऊंडमध्ये इमारत कोसळून दोन महिने होत नाही तेच आज पुन्हा मुंब्रा इथं आणखी एक इमारत कोसळली आहे. स्टेशन परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जण ठार झाले आहेत. तर 14 जण जखमी झालेत. मृतांमध्ये 6 महिलांचा समावेश आहे.
या ठिकाणी ढिगारा उपसण्याचं काम सुरु आहे. ठाण्यातल्या मुंब्रा स्टेशन परिसरात बाळाराम म्हात्रे स्मृती ही तीन मजली इमारत कोसळली. ही दुर्घटना मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमाराला घडली. जखमींना मुंब्रा इथल्या काळसेकर आणि कळव्यातल्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
या इमारतीमध्ये 10 कुटुंबं राहत होती. ढिगार्याखाली आणखी काही लोकं अडकल्याची शक्यता असून इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. यात जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.या दुर्घटनेकडं तातडीनं लक्ष घालून राज्य सरकारनं योग्य ती भुमिका घ्यावी अशी मागणी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Thane, Thane building collapse, मुंब्रा