मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पुण्यात 97 वर्षांनंतर पुन्हा घुमला टिळकांचा आवाज

24 ऑगस्ट'स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' अशी गर्जना करणारे भारतीय स्वातंत्र्याचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांचा आवाज 97 वर्षांनंतर पुण्यामध्ये घुमला. लोकमान्यांचा आवाज असलेलं ध्वनिमुद्रण नुकतंच उजेडात आलं. पुण्यातल्या केसरीवाड्यात एका खास कार्यक्रमात टिळकांचा हा आवाज ऐकवला मिळाला.लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. त्यावेळची सगळी छायाचित्रं, त्यावरचं विपूल लेखन, केसरीतले अग्रलेख सगळं काही उपलब्ध आहे. पण आता असा एक खजिना सापडलाय. तोही लोकमान्यांच्या आवाजातला....21 सप्टेंबर 1915 साली अर्थात तब्बल 97 वर्षांपूर्वीची ही ध्वनिमुदि्रका आहे. केसरी गणेशोत्सवात त्यावेळच्या गायकवाड वाड्यात मास्टर कृष्णराव, बालगंधर्व आणि देवगंधर्व-भास्करबुवा बखले यांचं गायन झालं होतं. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण केलं ते सेठ लखमीचंद इसरदास नारंग यांनी...टिळक पंचांगानुसार पुण्यात केसरीवाडा गणेशोत्सवाला सुरुवात झाली. त्यात टिळकांचे पणतू दीपक टिळक यांनी ही बाब सगळ्यांना सांगितली.त्यावेळच्या गणेशोत्सवात खास गायन मैफल आयोजित करण्यात आली होती. कृष्णराव, बालगंधर्व यांच्यानंतर भास्करबुवा बखले गायला बसले. त्यावेळी गोंधळ झाला. तेव्हा लोकमान्य टिळक उठले आणि त्यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं. हा कार्यक्रम होणारच, गडबड खपवून घेणार नाही, गडबड करणार्‍यांनी बाहेर जावं, असं टिळकांनी ठणकावलं होतं. त्याचं ध्वनिमुद्रण सेठ लखमीचंद यांनी करुन ठेवलंय.त्यावेळी लोकमान्य टिळक नेमकं म्हणाले होते,आजचा कार्यक्रम गणपती उत्सवाचा आहे, ठरल्याप्रमाणे गायनाचार्य बखलेबुवा याच्या गायनास सुरवात झालीच आहे. लोकांनी शांतपणे ऐकावं अशी माझी इच्छा आहे. कुणी गडबड केली तर मी ऐकून घेणार नाही. लोकांनी बाहेर जावं पण ठरलेला हा कार्यक्रम झालाच पाहीजे अशी माझी इच्छा आहे.भास्करबुवांच्या गाण्याबद्दल मला जे काही वाटतं ते वाटतं म्हणजे असं की, माझा विषय नाही, तथापी ही कला मोठी आहे. आणि त्यात विचार करण्यासारखं आहे असं मला वाटतं आणि ते काही खोटं नाही. भास्करबुवांबद्दल मला अभिमान आहे की मी जरी गायन शिकलो नाही, तथापी या कलेमध्ये थोडासा विचार व्हावा असं मला वाटतं, म्हणून बास्करबुवांच्या सारख्यांना मी इथे मुद्दाम तसदी दिली तर बुवासाहेब इथे आले आणि कार्यक्रम नक्कीच झालेला आहे. त्यांनी उत्तम तर्‍हेने काम केलेले आहे याबद्दल सर्वांतर्फे मी त्यांचे आभार मानतो अन गणपतीने प्रत्यक्ष गजानन स्वरूप आहे ते त्यांनी वारंवार असा प्रसंग आणून द्यावा असं मला वाटतं, इतकं बोलून मी आपली सर्वांची रजा घेतो. -लोकमान्य टिळकह्या सगळ्या ध्वनिमुद्रणाचा संग्रह केलाय तो सेठ लखमीचंद नारंग यांचे नातू मुकेश नारंग यांनी....तर मास्टर कृष्णराव यांच्या लोकमान्य टिळकांच्या आठवणी आणि शैला दातार यांनी लिहिलेल्या देवगंधर्व या चरित्रग्रंथातही अशी नोंद आहे.लोकमान्य टिळकांचा तो खणखणीत आवाज आज केसरीवाड्यात घुमला तोही गणेशोत्सवातच...तब्बल 97 वर्षांनी टिळकांचा तो बहारदार आवाज ऐकल्यानंतर पुणेकरही भावनिक झाले होते. पण यावेळी केसरीवाड्यात उपस्थित असलेले अनेक प्रेक्षक या ऐतिहासिक आणि दुर्मिळ क्षणाचे साक्षीदार बनले हेही तितकंच खरं.

पुढे वाचा ...

24 ऑगस्ट

'स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' अशी गर्जना करणारे भारतीय स्वातंत्र्याचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांचा आवाज 97 वर्षांनंतर पुण्यामध्ये घुमला. लोकमान्यांचा आवाज असलेलं ध्वनिमुद्रण नुकतंच उजेडात आलं. पुण्यातल्या केसरीवाड्यात एका खास कार्यक्रमात टिळकांचा हा आवाज ऐकवला मिळाला.

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. त्यावेळची सगळी छायाचित्रं, त्यावरचं विपूल लेखन, केसरीतले अग्रलेख सगळं काही उपलब्ध आहे. पण आता असा एक खजिना सापडलाय. तोही लोकमान्यांच्या आवाजातला....21 सप्टेंबर 1915 साली अर्थात तब्बल 97 वर्षांपूर्वीची ही ध्वनिमुदि्रका आहे. केसरी गणेशोत्सवात त्यावेळच्या गायकवाड वाड्यात मास्टर कृष्णराव, बालगंधर्व आणि देवगंधर्व-भास्करबुवा बखले यांचं गायन झालं होतं. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण केलं ते सेठ लखमीचंद इसरदास नारंग यांनी...टिळक पंचांगानुसार पुण्यात केसरीवाडा गणेशोत्सवाला सुरुवात झाली. त्यात टिळकांचे पणतू दीपक टिळक यांनी ही बाब सगळ्यांना सांगितली.

त्यावेळच्या गणेशोत्सवात खास गायन मैफल आयोजित करण्यात आली होती. कृष्णराव, बालगंधर्व यांच्यानंतर भास्करबुवा बखले गायला बसले. त्यावेळी गोंधळ झाला. तेव्हा लोकमान्य टिळक उठले आणि त्यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं. हा कार्यक्रम होणारच, गडबड खपवून घेणार नाही, गडबड करणार्‍यांनी बाहेर जावं, असं टिळकांनी ठणकावलं होतं. त्याचं ध्वनिमुद्रण सेठ लखमीचंद यांनी करुन ठेवलंय.

त्यावेळी लोकमान्य टिळक नेमकं म्हणाले होते,

आजचा कार्यक्रम गणपती उत्सवाचा आहे, ठरल्याप्रमाणे गायनाचार्य बखलेबुवा याच्या गायनास सुरवात झालीच आहे. लोकांनी शांतपणे ऐकावं अशी माझी इच्छा आहे. कुणी गडबड केली तर मी ऐकून घेणार नाही. लोकांनी बाहेर जावं पण ठरलेला हा कार्यक्रम झालाच पाहीजे अशी माझी इच्छा आहे.

भास्करबुवांच्या गाण्याबद्दल मला जे काही वाटतं ते वाटतं म्हणजे असं की, माझा विषय नाही, तथापी ही कला मोठी आहे. आणि त्यात विचार करण्यासारखं आहे असं मला वाटतं आणि ते काही खोटं नाही. भास्करबुवांबद्दल मला अभिमान आहे की मी जरी गायन शिकलो नाही, तथापी या कलेमध्ये थोडासा विचार व्हावा असं मला वाटतं, म्हणून बास्करबुवांच्या सारख्यांना मी इथे मुद्दाम तसदी दिली तर बुवासाहेब इथे आले आणि कार्यक्रम नक्कीच झालेला आहे. त्यांनी उत्तम तर्‍हेने काम केलेले आहे याबद्दल सर्वांतर्फे मी त्यांचे आभार मानतो अन गणपतीने प्रत्यक्ष गजानन स्वरूप आहे ते त्यांनी वारंवार असा प्रसंग आणून द्यावा असं मला वाटतं, इतकं बोलून मी आपली सर्वांची रजा घेतो. -लोकमान्य टिळक

ह्या सगळ्या ध्वनिमुद्रणाचा संग्रह केलाय तो सेठ लखमीचंद नारंग यांचे नातू मुकेश नारंग यांनी....तर मास्टर कृष्णराव यांच्या लोकमान्य टिळकांच्या आठवणी आणि शैला दातार यांनी लिहिलेल्या देवगंधर्व या चरित्रग्रंथातही अशी नोंद आहे.

लोकमान्य टिळकांचा तो खणखणीत आवाज आज केसरीवाड्यात घुमला तोही गणेशोत्सवातच...तब्बल 97 वर्षांनी टिळकांचा तो बहारदार आवाज ऐकल्यानंतर पुणेकरही भावनिक झाले होते. पण यावेळी केसरीवाड्यात उपस्थित असलेले अनेक प्रेक्षक या ऐतिहासिक आणि दुर्मिळ क्षणाचे साक्षीदार बनले हेही तितकंच खरं.

First published: