मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पुण्यात शॉर्टसर्कीटमुळे अडीच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

पुण्यात शॉर्टसर्कीटमुळे अडीच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

PUNE GIRL DIED

09 सप्टेंबर : पुण्यातील सिंहगड रोडवर पानमळा वसाहतीत महावितरणच्या पोलची वायर तुटून झालेल्या शॉर्टसर्किटमुळे एका अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असून यामध्ये 5 ते 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

महावितरणच्या पोलवर मोठ्या प्रमाणात वायरचे जाळं आहे. याबाबत एमएसईबीला वारंवार सांगूनही कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही असं येथील स्थानिकांचं म्हणणं आहे. पावसामुळे वीजेच्या पोलची तार तुटली. यामध्ये अद्वेता वाघमारे या अडीच वर्षाच्या चिमुरडीला आपले प्राण गमवावे लागले.

या घटनेनंतर स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने तात्काळ विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. पावसामुळे पोलवरील एका तारमधील वीजप्रवाह शेजारील घराच्या जिन्यामधे उतरला. यामुळे 5 महिला लांब फेकल्या गेल्या, परंतु अद्वेताचा जागीच मृत्यू झाला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Pune, पुण्यात, महावितरण