पुणे 02 जुन : सांस्कृतिक राजधानी पुण्यात पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने रेड लाईट भागात छापे टाकून सहा अल्पवयीन बांगलादेशी मुलींची सुटका केली. ढाक्यातल्या दोन अपहृत मुलींचा तपास करताना पोलिसांनी ही कारवाई केली. ढाका येथून दोन अल्पवयीन मुलीच अपहरण करून त्यांना पुण्याच्या कुंटनखाण्यात विकण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या मुलीच्या शोधात पोलिसांकडून रेड लाईट भागात ही धाड मोहीम राबविण्यात आली. या धाड मोहिमेत एकूण सहा अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. या अल्पवयीन मुलींना बळजबरीने वेश्या व्यवसायात ढकलणार्या तीन महिला आणि चार एजटंना पोलिसांनी अटक केलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.