मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /पुण्यात अफगाण लष्करी अधिकारी ८ महिन्यांपासून बेपत्ता

पुण्यात अफगाण लष्करी अधिकारी ८ महिन्यांपासून बेपत्ता

  afgan_pune31 डिसेंबर : पुण्यातील आर्मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षक म्हणून आलेला अफगाणिस्तानातल्या सैन्यातला लष्करी अधिकारी गेल्या आठ महिन्यांपासून गायब आहे. हादिम मोहम्मद सादिक असं बेपत्ता झालेल्या अधिकार्‍याचं नाव आहे. आयबी, रॉ, लष्करी गुप्तचर यंत्रणांकडून सादिकचा शोध घेतला जातोय.

  पिंपरी चिंचवड जवळच्या दापोडित असलेल्या आर्मी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये गेल्या वर्षी तो प्रशिक्षणासाठी आला होता. अफगाण आणि भारतीय लष्करातील इंजिनीअर्ससाठी सादिक दुभाषक प्रशिक्षक म्हणून काम करायचा.

  तो 3 महिन्यांनतंर अचानक बेपत्ता झाला. सादिक बेपत्ता असल्याच्या घटनेला आता 8 महिने उलटून गेले आहेत. तरीही त्याचा पत्ता लागला नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात LOC म्हणजेच लुकआउट सर्कुलर जारी केलंय.

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

  [if0] Follow @ibnlokmattv[sc0]

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  First published:

  Tags: Pune, अफगाणिस्तान, आर्मी इंजिनिअरिंग कॉलेज, हादिम मोहम्मद सादिक