17 सप्टेंबर : महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी पुण्यात आज गणरायाचं मोठ्या दिमखात आगमन होत आहे. यानिमित्ताने पुण्यात मांगल्य आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतय. पुण्यातील 5 मानाच्या गणपतींची दुपारपर्यंत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा वगळता सर्व चार आणि अखिल मंडई गणेश मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळांच्या गणपतींचीही प्राणप्रतिष्ठा दुपारपर्यंत होणार आहे. तत्पूर्वी सर्वच मंडळ श्रींची मिरवणूक काढणार आहेत. या मिरवणुकांमध्ये पारंपारिक वाद्यासह विविध पथके सहभागी होणार आहेत. गणपती उत्सवाची सुरुवात झालेल्या पुण्य-नगरीतील मानाच्या गणपतींचीही प्राण प्रतिष्ठा आजच होणार आहे.
पुण्याचा गणेशोत्सव खासच असतो. मानाचे गणपती हेही पुण्याच्या गणपतीचं वैशिष्ट्य...
आपण पाहुयात पुण्यात आज मानाच्या गणपतींची कशाप्रपकारे प्रतिष्ठापना होणार आहे.
- मिरवणूक सकाळी 8. 30 वाजता निघणार ,
- देवळणकर बंधू यांचे चौघडा वादन , शिववर्धन ढोलताशा पथकाचे वादन
- श्रींची प्राणप्रतिष्ठापना -11 वाजून 36 मि.
- मिरवणूक सकाळी 10 वाजता
- मंदार लॉजजवळून निघणार, सतीश आढाव यांचे नगारावादन,
- न्यू गंधर्व बँड , शिवमुद्रा ढोलताशां पथकांचं वादन होणार आहे.
- श्रींची प्राणप्रतिष्ठापना -12 वाजून 30 मि.
- गणपती चौकातून सकाळी 10 वाजता मिरवणुकीस प्रारंभ
- जयंत नगरकर यांचे नगारावादन
- अश्वराज बँड , शिवगर्जना ,नादब्रम्ह आणि गुरुजी प्रतिष्ठानचे ढोलताशां वादन
- 12. 45 ला प्राणप्रतिष्ठापना
- सकाळी 10 वाजता मंडइतील टिळक पुतळ्यापासून सुरुवात
- 81 किलोची चांदीची प्रभावळ हे मुख्य आकर्षण
- श्रींची प्राणप्रतिष्ठापना -12 वाजून 30 मि
- सकाळी 8 वाजता मिरवणुकीस प्रारंभ
- श्रींची प्राणप्रतिष्ठापणा - सकाळी 10वाजून 31 मीनि
- सकाळी 10 वाजता मिरवणुकीस प्रारंभ
- हन्सरथ हे आकर्षण
- प्राणप्रतिष्ठपना - दुपारी 12 वाजता
- भाऊ रंगारी
- सकाळी -8 वाजता मिरवणुकीला प्रारंभ
- श्रीराम वाद्य वृंद ,वेद्ब्राम्ह व ब्रम्हचैतन्य या पथकाचे वादन
- सकाळी 10.30 वाजता प्राणप्रतिष्ठापणा
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ganpati, Ganpati bappa moriya, Ganpati Bappa Morya Re, Ganpati murti, Ganpati visarjan, Ibn lokmat, Maharashtra ganpati, Mumbai ganpati, Pune ganpati