मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पुणे फेस्टिव्हलला मुंडेंच्या हजेरीनं भाजपमध्ये अस्वस्थता

20 सप्टेंबरसुरेश कलमाडी आयोजित पुणे फेस्टिव्हलला भाजपचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत. त्यामुळे पुण्यातील मुंडे आणि गडकरी असा दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमधे अस्वस्थता पसरली आहे. कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी कलमाडींच्या विरोधात दिल्लीत तसंच पुण्यात भाजप आघाडीवर होतं. पण आता गोपीनाथ मुंडे कलमाडींच्या मांडीला मांडी लावून बसणार असल्यामुळे कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे निमंत्रण असूनही भाजपचे स्थानीक नेते कार्यक्रमाला जाणार नसल्याचं समजतंय. दरम्यान, आता शरद पवारांनी मुंबईत बैठक लावल्यानं भुजबळांचं येणं बारगळलंय पण मुंडे - भुजबळ या बड्या ओबीसी नेत्यांना आपल्यासोबत आणून सुरेश कलमाडी कसलं राजकीय समीकरण मांडत आहे याची चर्चा पुण्यात रंगली आहे.

पुढे वाचा ...

20 सप्टेंबर

सुरेश कलमाडी आयोजित पुणे फेस्टिव्हलला भाजपचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत. त्यामुळे पुण्यातील मुंडे आणि गडकरी असा दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमधे अस्वस्थता पसरली आहे. कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी कलमाडींच्या विरोधात दिल्लीत तसंच पुण्यात भाजप आघाडीवर होतं. पण आता गोपीनाथ मुंडे कलमाडींच्या मांडीला मांडी लावून बसणार असल्यामुळे कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे निमंत्रण असूनही भाजपचे स्थानीक नेते कार्यक्रमाला जाणार नसल्याचं समजतंय. दरम्यान, आता शरद पवारांनी मुंबईत बैठक लावल्यानं भुजबळांचं येणं बारगळलंय पण मुंडे - भुजबळ या बड्या ओबीसी नेत्यांना आपल्यासोबत आणून सुरेश कलमाडी कसलं राजकीय समीकरण मांडत आहे याची चर्चा पुण्यात रंगली आहे.

First published: