Home /News /news /

'पुणे तिथे काय..,'पाट्यांमुळे उमेदवारांची पंचाईत !

'पुणे तिथे काय..,'पाट्यांमुळे उमेदवारांची पंचाईत !

अद्वैत मेहता, पुणे

14 फेब्रुवारी : महापालिका निवडणुकीत घरोघरी प्रचार करण्याला खूप महत्व आहे. पण ठिकाण जर पुणे असेल तर मतदाराच्या घरी एंट्री मिळवणे म्हणजे उमेदवारांची सत्वपरीक्षाच...यंदाच्या पालिका निवडणुकीत अनेक सोसायट्यानी पुणेरी अटी टाकल्यानं उमेदवार हैराण आहेत. pune_patiनगरसेवक हरवले आहेत त्यापासून ते 2012 ला हरवले. आता 2017 ला सापडले अशा पाट्या, बॅनर्स, होंर्डिंग झळकू लागली. आता  हे कुठं अर्थात स्थळ पुणे हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यात आता भर पडली आहे. पालिका निवडणुकीकरता सोसायटीमध्ये प्रचार पत्रकं वाटण्यास म्हणजे हाऊस ते हाऊस प्रचारास करण्यात येत असलेला अटकाव अर्थात अशा आशयाची पुणेरी पाटी नसली तरी उमेदवारांना पुणेरी स्पष्ट,फटकळ भाषेत हे सांगण्यात येतंय. थोडक्यात सोसायट्यामध्ये राहणाऱ्या उच्चभ्रू मतदारांपर्यंत पोचणं हे जिकिरीचं काम आहे. एकीकडे काही सोसायट्यानी रंगकाम करून घेणे,अंतर्गत रस्ते,बाकडी बसवणे,पाण्याची पाईप लाईन टाकून घेणे अशी कामे पदरात पाडून घेतल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे प्रवेशच नाही. हा पुणेरी बाणा दुसरीकडे...यामुळे ज्यांचा जनसंपर्क नाही. जे एकदम 5 वर्षांनी निवडणुकीवेळी उगवतात त्यांना प्रचाराच्यावेळीच परीक्षेला सामोरं जावं लागतंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Pune, Pune election, पुणे

पुढील बातम्या