17 एप्रिल : उत्साहानं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडलेल्या अनेक पुणेकर नागरिकांना आज निराश व्हावं लागलं. कारण हजारो मतदारांची नावंच या यादीतून गायब असल्याचं समोर आलं. अनेक ठिकाणी मतदार यादीत गोंधळ असल्याचं समोर आलं. 'आमची नावं मतदार यादीतून गायब कशी झाली ?' असा सवाल विचारत पुणेकर नागरिकांनी जिल्हाधिकार्यांना संध्याकाळी घेराव घातला.
भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी तर यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला. शिरोळे यांनी फेरमतदान घेण्याची मागणीही केली. फेरमतदान घेतलं नाही तर उद्यापासून बेमुदत उपोषणाचा इशाराही शिरोळे यांनी दिलाय. तर आम आदमी पार्टीचे उमेदवार सुभाष वारे यांनीही उद्यापासून आंदोलनाचा इशारा दिलाय. दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे अहवाल देणार असल्याचं स्पष्ट केलंय.
सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात आज मतदान यंत्रणेत मोठा घोळ समोर आला. भाजपला मतदान करण्यासाठी कमळासमोरचं बटन दाबल्यावर काँग्रेसला मत जात असल्याचं समोर आलंय. पुण्यातील शामराव कलमाडी शाळेतील मतदान केंद्रात हा प्रकार घडलाय. विशेष म्हणजे 23 जणांनी मतदानही केलं होतं. यामुळे काही काळ एका खोलीतलं मतदान थाबवण्यात आलं होतं. त्यानंतर मतदानाला पुन्हा सुरुवात झाली.
एवढेच नाही तर यानंतर मतदार यादीत घोळ असल्याचं समोर आलंय. शंभर मतदारांचे नाव मतदारयादीतून गायब झाल्याचं समोर आलंय. त्यानंतर नागरिकांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्यांची भेट घेतली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. या निवडणुकीत काहीही करू शकत नाही, पुढच्या निवडणुकीत बघू असं थातुरमातूर उत्तर दिलं. यावेळी मतदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली. एवढंच नाहीतर ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर, संध्या गोखले आणि सलील कुलकर्णी यांचीही नावं गायब असल्याचं समोरं आलं.
तर दुसरीकडे उपजिल्हाधिकारी अपूर्वा वानखेडे यांनी यावर खुलासा केला. मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही यासाठी आम्ही वारंवार आवाहन केलं. मतदार यादीत तुमचं नाव आहे की, नाही हे तपासून घेण्याचं नागरिकांचं काम होतं. जर तेव्हाच हे कळालं असतं तर त्यांची नाव नोंदवून घेतली असती. आपलं नाव यादीत आहे की, नाही हे पाहणंही लोकांचं कर्तव्य आहे असं सांगत उपजिल्हाधिकारी अपूर्वा वानखेडे यांनी मतदारांच्या डोक्यांवर खापर फोडलं.पण ज्यांची नावे मतदार यांद्यांमध्ये आहेत त्यांनाच मतदान करता येणार आहे. लोकांनी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात त्याची दखल घेतली जाईल. पुर्ननोंदणी करतेवेळी त्यांचा यादीत समावेश होईल.
पण आता मतदान करता येणार नाही अशी ठाम भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली. पण आतापर्यंत महापालिका, विधानसभा आणि लोकसभेसाठीही मतदान केलं असतानाही आमची नावं आताच गायब कशी झाली, असा सवाल पुणेकर नागरिक करत आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election, Fake voting, Maharashtra lok sabha election, Pune, Pune election, Pune voting list, Voting, Voting list, अनिल शिरोळे, निवडणूक आयोग, पुणे, पुणेकर, भाजप, मतदान