Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'पीएमपीएमएल'ला 70 कोटींचा निधी मंजूर

'पीएमपीएमएल'ला 70 कोटींचा निधी मंजूर

Extra-buses-to-run-from-Monday18 नोव्हेंबर :  पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, अर्थात (पीएमपीएमएल) कर्मचार्‍यांच्या पगारातील फरक आणि आर्थिक तूट भरून काढण्यासाठी तब्बल 70 कोटी निधी देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली.

पीएमपीएमएलच्या स्थापनेला 7 वर्षे झाली, तरी अद्याप कारभार सक्षम झालेला नाही. दरदिवशी तोटा वाढत आहे. त्यामुळे पीएमपीएमएलने सीएनजी ठेकेदारांची बिले थकविली होती. वेळेत थकबाकी दिली नाही, तर सीएनजी पुरवठा बंद करण्याचे पत्र पीएमपी प्रशासनाला दिले. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सीएनजी बिले आणि आर्थिक तूट भरून काढण्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधीसाठी मान्यता दिली आहे. तर उरलेले 50 कोटींची रक्कम कामगारांच्या थकित वेतनासाठी देण्यात येणार आहे. या ठरावाला स्थायी समितीने आज मान्यता आहे. पण निधी मंजूर करण्याबरोबरच पीएमपीएमएलनं गेल्या वर्षीच्या तुटीचं ऑडिट करून घ्यावं, असं सांगित यावेळी सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, पीएमपीएमएलला पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 34.5 कोटी रुपयांचं येणं आहे.  पुणे महापालिकेनी त्यांची थकलेली रक्कम दिली, तर आम्हीही पीएमपीएमएलला हे साडे चौतीस कोटी रुपये देऊ, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी IBN लोकमतला दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: 'पीएमपीएमएल'ला, 70 crore, 70 कोटी, PMP, PMPML