Home /News /news /

पालघरमध्ये भरतेय आजीबाईंची शाळा

पालघरमध्ये भरतेय आजीबाईंची शाळा

07 फेब्रुवारी : आकर्षित करुन घेणारे शाळेचे युनिफॉर्म, एकसारखे बूट, बेल्ट वगैरे घातलेली शाळेची मुलं आपण पाहिली आहेत..पण ठाणे जिल्ह्यातील पालघरमध्ये एक अनोखी शाळा भरते. ही आहे चक्क आजीबाईंची शाळा. गावातल्या आजी या शाळेत जातात. भरजरी नऊवारी गुलाबी साडी आणि गुलाबी ब्लाऊज असा युनिफॉर्म घालून, काठी टेकत एका रांगेत शाळेत जाणाऱ्या या आजीबाई.ठाणे जिल्ह्यातील पालघरमध्ये ही आहे आजीबाईंची शाळा.लख्ख गुलाबी साडीत सर्व आजीबाई शाळेत येतात आणि लिहायला, वाचायला, गुणायला, भागायला शिकतात.या आजीबाई मराठीतून धडे गिरवत आहेत. aaji shala नातवंडांना शाळेत सोडायला आलेले आजी-आजोबा आपण पाहिले आहेत. मात्र इथे नातवंडंच आपल्या आजीला शाळेत सोडायला येतात.गेल्या वर्षी महिला दिनी म्हणजेच 8 मार्च 2016 रोजी ही आजीबाईंची शाळा सुरू झाली.60 ते 90 वयोगटातील 27 आजीबाईंनी या शाळेत प्रवेश घेतला. सीता आजीचं वय वाढलं म्हणून काय झालं, त्यांची शिकण्याची उमेद मोठी आहे. चालायला त्रास होत असला, तरी आपल्या 8 वर्षांच्या नातीसोबत त्या काठी टेकत शाळेत येतात.सीताआजी शाळेत जाते म्हटल्यावर गृहपाठ असणारच. मात्र चिमुकली अनुष्का आजीला गृहपाठासाठी मदत करते. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक योगेंद्र बांगर यांनी मोतीराम दलाल चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने आजीबाईंची शाळा सुरू केली.म्हातारपणी किमान पोथी, धार्मिक पुस्तकं वाचता यावी, अशी अपेक्षा एका आजीने व्यक्त केली आणि योगेंद्र बांगर सरांच्या डोक्यात आजीबाईंच्या शाळेची कल्पना सुचली. या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेली ही शाळा.त्यामुळे या शाळेच्या वर्गाभोवती अनेक झाडं आहेत आणि ही झाडं आजीबाईंनी लावलं आहेत. त्यामुळे ही झाडं त्यांची ओळख आहे.अनेक वर्षांपासून आजीबाईंच्या मनातील शिकण्याची इच्छा आज या आजीबाईंच्या शाळातून पूर्ण होतेय.आणि आज आजीबाईंना लिहता- वाचता येत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहताना दिसून येतोय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Palghar, School, पालघर

पुढील बातम्या