Home /News /news /

पहिल्या पावसात मुंबई भिजली, लोकल कोलमडली

पहिल्या पावसात मुंबई भिजली, लोकल कोलमडली

 mumbai_local_rain

मुंबई 11 जून : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना आज पावसाने चिंब भिजवलं. मुंबईसह ठाणे उपनगरात आज सकाळी पावसानं हजेरी लावली. पहिल्या पावसाने मुंबईकर सुखावले असले तरी मुंबईची लाईफलाईन मात्र कोलमडली. तिन्ही मार्गावरील वाहतूक कोलमडून पडली. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईनवर सर्व गाड्या धीम्या गतीने सुरू आहे. 20 ते 30 मिनिटाने लोकल उशिराने धावत आहे.

मुंबई शहर आणि उपनगर पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर पावसाने दिलासा दिला. सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाला सुरूवात झाली. पूर्व आणि पश्चिम उननगरं आणि दक्षिण मुंबई त पावसाने गारेगार दिलासा दिला. पहिल्या पावसातच मात्र रेल्वेचा बोजवारा उडालाय तिन्ही मार्गांवर प्रवाशांचा खोळंबा झालाय. गाड्या उशिरानं धावतायेत. ठाणे रेल्वे स्थानकावर अजूनही खूप गर्दी आहे. लोकल उशिरानं धावतायेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतायेत. मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गांवर सकाळी गाड्या उशिरानं धावत होत्या. सकाळीच ऑफिस गाठणार्‍या चाकरमान्यांना आज उशिराने ऑफिसला पोहचावे लागले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: Mumbai, Mumbai rain, मुंबई

पुढील बातम्या