04 ऑक्टोबर : नुकताच अमेरिका दौरा आटोपून भारतात परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी स्टँडबाय असलेल्या एअर इंडियाच्या विमानात रिकामा ग्रेनेड आढळल्यामुळे सुरक्षा यंत्रणा हादरली आहे. हे विमान मोदी यांच्या अमेरिका दौर्यासाठी स्टँडबाय म्हणून सज्ज होते.
पण या विमानाचा वापर झाला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौर्यावर जाण्यासाठी एअर इंडियाकडून विशेष विमान सज्ज करण्यात आलं होतं. पंतप्रधानांच्या दौर्यासाठी ऐनवेळी काही अडचण आल्यास आणखी एक विमान सज्ज करण्यात आलं होतं. एअर इंडिया केबी-747 असं हे विमान होतं. मात्र हे विमान मोदींच्या दौर्यादरम्यान वापरण्याची वेळ आली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मोदी भारतात परतल्यानंतर हे विमान पुन्हा वाहतूक सेवेत दाखल करण्यात आलं त्यानंतर हा प्रकार समोर आला. सध्या हे विमान दिल्ली-मुंबई-हैदराबाद-जेद्दा ला पाठवण्यात आलंय. शनिवारी सकाळी जेद्दामध्ये हे विमान पोहचल्यानंतर सुरक्षारक्षकांनी विमानाची तपासणी केली असता विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये रिकामा ग्रेनेड सापडला. पंतप्रधानांच्या दौर्यासाठी सज्ज करण्यात आलेल्या विमानात ग्रेनेड आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.
+++++++++++++++++++++++++
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.